Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics : भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमले; अमित देशमुखांनी सांगितलं कारण

Jagdish Pansare

Latur Political News : नगर पंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक नेमले आहेत. स्वतःला महासत्ता म्हणवणाऱ्या भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना इंग्रजांच्या काळातील व्हाइसरॉय, गव्हर्नर पद्धतच आवडते, असा टोला माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी भाजपला लगावला.

लोकशाही पद्धत भाजपला मान्य नाही, म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते घेत नाहीत. त्यांना सगळी सत्ता आपल्या हाती पाहिजे आहे, असा आरोप देशमुख यांनी केला. महाविकास आघाडीचे लोकसभेच्या लातूर मतदारसंघाचे उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे Shivaji Kalge यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

'लातूरमध्ये एकच फॅक्टर काळगे डाॅक्टर', असे म्हणत जे पाच वर्षे मतदारसंघात फिरकले नाही, त्यांना आता येऊ देऊ नका, असा टोलाही देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे Sudhakar Shrangare यांना लगावला. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचे नाही, निवेदन द्यायचे नाही, निदर्शने करायची नाही, याचाच अर्थ यांना लोकशाही मान्य नाही.

हा देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालतो, पण यांना ते संविधानही नको आहे. पण याच संविधानाने दिलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करून संविधानाचे रक्षणकर्ते काळगे यांना निवडून पाठवा, असे आवाहन अमित देशमुख Amit Deshmukh यांनी केले. लातूर मतदारसंघात जिथे जिथे काळगे आणि आपण जाऊन प्रचार करतो, तिथे पुढच्या दोन दिवसात माजी खासदार जातात, अशी माहिती आहे.

खरतरं त्यांनी आता कुठे फिरायची गरज नाही, जे पाच वर्षात कधी आले नाही, त्यांना आता येऊ देऊ नका, असे आवाहन करतानाच अमित देशमुख यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. काळगे यांना लोकसभेत निवडून पाठवा, तुमचे प्रश्न मांडणारा, आवाज उठवणारा आणि ते सोडवणारा खासदार पाहिजे, असेही अमित देशमुख म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेती मालाला भाव नाही, महागाई वाढली आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेलं नाही. शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांवर एवढचं नाही तर अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या सामानावर जीएसटी लावणारं हे निर्दयी सरकार असल्याची तोफ अमित देशमुख यांनी डागली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT