Vishwajeet Kadam News : विशाल पाटील एकटे पडले? विश्वजीत कदम अन् चंद्रहार पाटील एकत्र, सांगलीत काय सुरू?

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीतून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत कदम आणि विशाल पाटलांनी दिल्ली वाऱ्या केल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने सांगलीतून विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी, अशी भावना विश्वजीत कदमांसह राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या.
Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Vishwajeet Kadam, Chandrahar PatilSarkarnama

Sangli Political News : सांगली लोकसभा मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेस नेते, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सर्व प्रयत्न केले. मात्र ही जागेवर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर बंडखोरी करत विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सांगलीतून तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे कदम आघाडीचा धर्म पाळणार का, याकडे लक्ष लागले होते. आता ते स्पष्ट झाले असून कदम आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येत आहे.

सांगलीतून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांच्या उमेदवारीला विरोध करत कदम आणि विशाल पाटलांनी दिल्ली वाऱ्या केल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने सांगलीतून विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी, अशी भावना विश्वजीत कदमांसह राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने विशाल पाटलांनी बंडाचे निशाण फडकावले. पाटलांची भूमिका आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे विश्वजीत कदम काय भूमिका घेणार, याकडे लक्ष होते.

आता विश्वजीत कदम Vishwajeet Kadam आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. याबाबत खुद्द चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. ते म्हणाले, सांगली लोकसभेच्या प्रचारार्थ २८ एप्रिल रोजी काही गावांत सभा पार पडल्या. यात खटाव, ब्रम्हनाळ, माळवाडी, भिलवडी (ता. पलुस) या गावांचा समावेश होता. येथे माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार अरुण आण्णा लाड, महेंद्र लाड, शरद लाड आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती.

Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Baramati Lok Sabha News : 'माहेरवाशीण'चा पाहुणचार करा अन् सासरी पाठवा; अजितदादांचा बहिणीला टोला!

दरम्यान, काँग्रेसकडे सांगली राखण्यासाठी आणि विशाल पाटलांना Vishal Patil उमेदवारी मिळण्यासाठी विश्वजीत कदमांनी सर्वात आधी पुढाकार घेतला होता. याबाबत त्यांनी दिल्लीतील सर्व नेत्यांची भेट घेऊन येथील काँग्रेसच्या ताकदीचे गणित मांडले होते. विशाल पाटलांची उमेदवारी कशी योग्य राहिल, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कदम हे पाटलांना साथ देतील, अशी चर्चा होती. मात्र कदमांनी आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. परिणामी विशाल पाटील एकटे पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vishwajeet Kadam, Chandrahar Patil
Devendra Fadnavis Sabha : शिंदे-सावंत कुटुंबाच्या एकीचे बळ मतांमध्ये दिसलं पाहिजे; देवेंद्र फडणवीसांची ताकीद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com