Mla Amit Deshmukh News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh : लोकसभा-विधानसभा एकत्र होण्याची शक्यता, तयारीला लागा..

Marathwada : निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा व्यासपीठावर उपस्थित लोकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

जलील पठाण.

Latur : कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केले. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होवू शकतात, असे संकेत देखील त्यांनी दिले.

काँग्रेसचे (Congerss) अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्यावर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांसह उटगे यांनाही अमित देशमुखांनी सोडले नाही. मात्र असे करताना त्यांनी श्रीशैल उटगे यांना बऱ्याच गोष्टीत ग्रीन सिग्नलही दिला. (Latur) खरे तर कार्यक्रम नूतन सदस्यांच्या सत्काराचा होता मात्र या कार्यक्रमातून अमित देशमुखांनी एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कानातील मळ बाहेर काढला तर उटगे यांच्या पाठीशी पक्ष व पक्षाचे नेते असल्याची आठवणही करून दिली.

जेव्हापासून औशातील सत्काराचा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हापासून काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून आली. ही अस्वस्थता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. तर बसवराज पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी व नूतन सदस्यांनी पाटलांचा फोटो बॅनरवर नसल्याची तक्रारही केली.

देशमुख समर्थक गट जाणून बुजून बसवराज पाटलांना व त्यांच्या निकटवर्तीयना डावलत असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे पदाधिकारी व पक्षाचे कांही नेते गैरहजर राहिले. जिल्हा काँग्रेस कमिटीची तक्रारच कांहीनी अमित देशमुखाकडे कार्यक्रमच्या अगोदर केली. या सर्वांची दखल देशमुख यांनी घेत आपल्या भाषणात निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा व्यासपीठावर उपस्थित लोकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचा टोमणा मारला.

यावरूनच देशमुखांच्या डोक्यात काय चालले आहे याची कल्पना उपस्थितांना आली. नाराज कार्यकर्त्यांना व जिल्हाध्यक्ष यांना उद्देशून ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष बाकी राहिले आहे. बहुतेक लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या पक्षात सर्व कांही आलबेल आहे असे नाही. सर्वांना सोबत घेऊन ज्या प्रमाणे राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पदयात्रा काढून हात से हात जोडो हे अभियान राबविले. हाच संदेश गावागावात पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT