Ashok Chavan News : चव्हाणांची `ती` मागणी रावसाहेब दानवेंनी केली पुर्ण ..

Raosaheb Danve : स्वतः रावसाहेब दानवे यांनी फोन करून अशोक चव्हाण यांना याबद्दल माहिती दिली.
Ashok Chavan-Raosaheb Danve News, Aurangabad
Ashok Chavan-Raosaheb Danve News, AurangabadSarkarnama

Marathwada : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी डिसेंबरमध्ये जालना जिल्ह्यातील घनसांवगी येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या भाषणात रावसाहेब दानवे यांच्याकडे एक मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ती दीड महिन्यातच पुर्ण केली.

Ashok Chavan-Raosaheb Danve News, Aurangabad
Sandipan Bhumre News : भुमरेंना मुलासाठी मतदारसंघ सोडायचा ? म्हणून लोकसभेवर दावा..

स्वतः रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी फोन करून अशोक चव्हाण यांना याबद्दल माहिती दिली, त्यावर अशोक चव्हाण यांनी देखील त्यांचे आभार मानले आहेत. (Marathwada) साहित्य संमेलनात अशोक चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडून काही अपेक्षा व्यक्त करत मागणी केली होती.

ती मागणी होती मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे अत्यंत खराब असल्याने नवीन डबे देण्यात यावेत. दानवे यांनी चव्हाणांच्या या मागणीची दखल घेतली आणि त्यानुसार येत्या १३ फेब्रुवारीपासून देवगिरी एक्स्प्रेसला सर्व सुविधायुक्त नवे एलएचबी डब्बे जोडले जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी फोन करून हे आपल्याला कळवल्याचे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, त्यासाठी मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हा विभाग दक्षिण मध्यतून वगळून मध्य रेल्वेला जोडण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी, असल्याचे चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com