Amit Deshmukh Criticise Maharashtra Government News Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh News : शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी, मग शेतकऱ्याच्या मदतीसाठी पैसे नाहीत का? अमित देशमुख सरकावर संतापले

Congress Demand For Heavyrain Affected Farmers : मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ई-पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबरवरून आता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Jagdish Pansare

  1. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सरकारवर तीव्र टीका करत विचारले की, “शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी आहेत, पण शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी नाही का?”

  2. देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित केले.

  3. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यांवर नव्याने राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

Latur Congress : मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी, महापूराने थैमान घातले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना राज्य आणि केंद्रातील सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी सरकारकडे आहेत, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत? अशा शब्दा आमदार अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील नुकसानीच्या आढावा बैठकीत संताप व्यक्त केला.

मराठवाडासह लातूर जिल्हयात अतिवृष्टीने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात तर सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेवर खूप अन्याय केला असून, काँग्रेस पदाधिकाऱ्यांशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर इतर कोणीही गेलेले नाही. संकटकाळात काँग्रेस पक्ष सामान्य माणसाच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे. जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष लढा देणार, अशी ग्वाही अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली.

काँग्रेसने नेमलेल्या पक्ष निरीक्षकांकडून 62 महसूल मंडळांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. जोपर्यंत शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष लढा देणार आहे. जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांनी सादर केलेल्या 60 हून अधिक अहवालांचा एक सविस्तर अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि कृषी मंत्री यांना देखील हा अहवाल सादर केला जाईल.

मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर ई-पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबरवरून आता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या महिन्यात ई-पीक पाहणी आणि पीक कापणी प्रयोगावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दक्ष राहून शेतकऱ्यांना मदत करावी, असे अमित देशमुख यांनी केले. 'शक्तीपीठ'साठी 20 हजार कोटी रुपये सरकारकडे आहेत, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मात्र पैसे नाहीत का? केंद्र व राज्य सरकार काहीतरी आकडे जाहीर करून वेळ मारून नेईल, अशी टीकाही त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणे हे विरोधी पक्ष म्हणून आपले काम आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपये सरकारने काढून ठेवले, पण शेतकऱ्याला मदत करायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन करतानाच काँग्रेस पक्ष शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. अशा संकट काळात सरकारसोबत भांडू, असा विश्वासही देशमुख यांनी बैठकीत दिला.

FAQs

1. अमित देशमुख यांनी काय प्रश्न उपस्थित केला?
त्यांनी विचारले की सरकारकडे महामार्गासाठी 20,000 कोटी आहेत, पण शेतकऱ्यांसाठी मदतीचा निधी का नाही?

2. कोणत्या महामार्गाबाबत हे वक्तव्य करण्यात आले?
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात हे वक्तव्य करण्यात आले.

3. अमित देशमुख कोणत्या पक्षाचे आहेत?
ते काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत.

4. या वक्तव्यानंतर सरकारकडून प्रतिक्रिया आली का?
अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

5. या वक्तव्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
यामुळे काँग्रेस आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे, तसेच शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी येऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT