Kalyan Kale-Amit Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

अमित देशमुखांनी केली कल्याण काळेंची पाठराखण

कल्याण काळे हे स्व.विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. देशमुख घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. (Minister Amit Deshmukh)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा आरोप सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केला होता. (Congress) या शिवाय काॅंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी काळे हे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत की भाजपचे? असा सवाल करत ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू केल्या होत्या. (Aurangabad) या सर्व चर्चा आणि आरोपांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याचे संपर्क नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी मात्र काळे यांची पाठराखण केली आहे.

काळे हे जिल्ह्यातील काॅंग्रेस मजबुत ठेवू शकतात, फक्त त्यांच्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असयाला हवा, असा सल्ला देखील दिला. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सहकाराच्या भावनेतून घेतलेल्या निर्णयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, काळे यांनी घेतलेली भूमिका योग्य होती, असे समर्थन देखील देशमुख यांनी केले. त्यामुळे काळे समर्थकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल सदस्य नोंदणी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन औरंगाबादेत करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात राज्याच्या सत्तेत काॅंग्रेस असल्याचा आनंद इथल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली.

तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे न्याय मिळायला वेळ लागतो, पण आमचे सगळ्या गोष्टींवर बारकाईने लक्ष असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्याबद्दल आपल्याकडे अनेक तक्रारी आल्याचे सांगत, त्यांनी सहकाराच्या दृष्टीने दुध संघाच्या निवडणुकीत घेतलेली भूमिका योग्यच होती, तेच जिल्ह्यातील काॅंग्रेसला एकसंध ठेवू शकतात, असे सांगत त्यांची पाठराखण केली.

देशमुखांनीच काळे यांची बाजु घेतल्याने काळे विरोधकांचे चेहरे उतरले. काळे यांनीही आपल्या भाषणात आपण काॅंग्रेसमध्ये राहणार आहोत, भाजपमध्ये जाणार नाही, असे स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला.

कल्याण काळे हे स्व.विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. देशमुख घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. विलासरावांच्या निधनानंतरही त्यांनी ते कायम ठेवले. त्यामुळेच अमित देशमुख हे देखील काळेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT