Amol Mitkari on Ajit Pawar News
Amol Mitkari on Ajit Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणारच, त्यांच्या तोलामोलाचा दुसरा नेता नाही हे अमित शहा यांनाही मान्य...

सरकारनामा ब्युरो

Beed : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या आणि ते मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा काही केल्या थांबत नाहीयेत. आताच मुख्यमंत्री व्हायला आवडेल अस बिनाधास्तपणे सांगितल्यानंतर अजित पवार यांच्या राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर देखील झळकत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी `अजितदादा मुख्यमंत्री होणारच, वेट अॅन्ड वाॅच`, म्हणत पुन्हा या चर्चेला हवा दिली आहे.

यावेळी त्यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांचा हवाला देत अजितदादा यांच्यासारखा तोलामोलाचा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही हे अमित शहा यांना देखील मान्य असल्याचा दावा देखील केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांसारखा अभ्यासू माणूस नाही, असेही मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

बीडमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी माध्यमांशी बोलतांना हे विधान केले आहे. मिटकरी म्हणाले, जसं हे राज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा, तसेच कार्यकर्ते म्हणून सर्वांची (Ajit Pawar)अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही भावना आहे. आता लोकशाहीमध्ये प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तीमत्व असणारा एखादा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी असावा ही भूमिका अन् भावना प्रत्येकाची आहे.

माझी सुद्धा भावना कार्यकर्ता म्हणून आहे. त्यामुळे धाराशिव, नागपूर मध्ये लागलेले बॅनर यावरून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते मान्य केलेलं आहे. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादा करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि ते त्यांनी करावं. कारण अजितदादा सारखा दुसरा तोला-मोलाचा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात सापडेल, असं सध्या तरी दुसरं कोणी नाही.

हे दस्तूर खुद्द अमित शहा यांनी कबूल केलेलं आहे, असा दावाही अमोल मिटकरी यांनी केला. अजितदादा मुख्यमंत्री होणारचं आहेत, `वेट अँड वॉच`, याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. एकनाथ शिंदेसाहेब रजेवर गेलेले आहेत, पण त्याचा याच्याशी संबंध लावण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असेही मिटकरी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT