Beed APMC Election News : तुमच्या बॅनरवर रतन खत्री, दाऊदचे फोटो पाहिजेत ; आमदार क्षीरसागरांवर भावाची टीका..

Yogesh Kshirsagar : सर्व अवकाळी लोकांनी एकत्र येऊन केलेली ही अवकाळी युती आहे.
Beed APMC Election News
Beed APMC Election News Sarkarnama

Marathwada : बीड जिल्ह्याच्या राजकारणात काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता यात आमदार क्षीरसागर यांच्या भावाचीही भर पडली आहे. बाजार समिती निवडणुकीसाठीच्या मतदान प्रचाराचे अवघे काही तास शिल्लक असतांना योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) यांनी भावावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

Beed APMC Election News
Mp Sanjay Jadhav Warns News : मेडिकल काॅलेजच्या कामात खोडा घालाल, तर रस्त्यावर उतरू..

` तुमच्या प्रचाराच्या बॅनरवर महापुरूषांचे नाही, तर माणिकचंद, रतन खत्री, दाऊदचे फोटो पाहिजेत`, अशा शब्दात निशाणा साधला आहे. कारण हेच त्यांचे आदर्श असल्याचे नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. कालच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी पुतणे संदीप (Sandip Kshirsagar) यांच्यावर मांजरसुंबा येथील मेळाव्यात टक्केवारी, वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी आपल्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत भावावर निशाणा साधला.

योगेश क्षीरसागर म्हणाले, यांच्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो नाही तर माणिकचंद, रतन खत्री अन् दाऊदचे फोटो पाहिजेत. कारण हे ज्यांना आदर्श मानतात त्यांचे फोटो यांच्या बॅनर असायला पाहिजेत. (Beed) उगीच महापुरुषांची बदनामी कशाला? भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावरही नाव न घेता त्यांनी टीका केली.

कोणतीही सत्ता ही एकहाती असावी लागते. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्र सरकार देखील आपण पाहिले, जिथे सर्व एकत्र येतात तिथे खिचडी होते. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत जी युती आपल्या समोर झालीय ती अवकाळी पाऊस, वातावरणासारखी आहे. सर्व अवकाळी लोकांनी एकत्र येऊन केलेली ही अवकाळी युती आहे. या अवकाळी युतीपासून तुम्हाला फक्त छत्रीचं वाचवू शकते. त्यामुळे त्या छत्रीवर ठसा देऊन हक्क बजवा, आपला आशिर्वाद द्या, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com