Amol Khune attacked in Beed : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी परंतु नंतर त्यांच्या विरोधात गेलेले अमोल खुणे यांना जमावाने लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केल्याची घटना पाली (ता. बीड) येथील नागनाथ मंदिरात आज घडली.
नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला आपल्याला जाता येऊ नये, या सुनियोजित उद्देशानेच जरांगे यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला, अशा असा दावा खुणे यांनी केला. बीड ग्रामीण पोलिस या प्रकाराची चौकशी करीत आहेत.
अमोल खुणे हे पाली येथील नागनाथ मंदिरात आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही तरुणांनी अचानक त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी मंदिराचा दरवाजा आतून बंद करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली, असा आरोप खुणे यांनी केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी बीड (BEED) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमोल खुणे हे तुळजापूरहून आपल्या गावी ज्योत घेऊन येत असताना, पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात 50 ते 100 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अमोल खुणे बेशुद्ध पडले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या समर्थकांनीच हा हल्ला केला असा आरोप त्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच खुणे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आर्थिक रसदीवरून गंभीर आरोप केले होते. यानंतर या आरोपांना राजकीय रंग चढला होता.
या प्रकरणात अमोल खुणे यांनी मनोज जरांगे पाटील यांनीच माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली होती, असा पुढेही आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलिसांकडून चौकशी होत असल्याने, हल्लेखोर कोण होते, याचा तपास घेतला जात आहे.
नारायण गडावर दसरा मेळावा होत असून या मेळाव्याला मी येणार असल्याची जाहीर केले होते. मी त्या ठिकाणी येऊ नये म्हणूनच हा हल्ला माझ्यावर करण्यात आल्याचाही दावा अमोल खुणे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यापासून त्यांच्यासह समर्थकांवर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप होऊ लागले आहेत. आता तर थेट हल्ले होऊ लागल्याने, आंदोलनानंतर प्रकरण गंभीर वळणावर पोहोचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.