Mumbai Shivaji Park Police Action : पोलिसांच्या गफलतीनं आंदोलनात गंमतीजमती? साध्या वेशातील कर्मचाऱ्यासह बघ्यांना, केटरिंग व्यावसायिकाला घेतलं ताब्यात

Police action Mumbai Shivaji Park draws criticism after plainclothes policeman and several civilians were reportedly detained : आंदोलनादरम्यान 400 ते 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; आपच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही ताब्यात घेतल्याचा आरोप, पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप.
Mumbai Police
Mumbai PoliceSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai Police : मुंबई शिवाजी पार्क परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईची गांभीर्यता वाढण्यापेक्षा गंमतीजमती अधिक चर्चेत आल्या.

साध्या गणवेशात असलेल्या पोलिसालाच आंदोलक म्हणून ताब्यात घेणे, आपच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन ताब्यात घेणे, तसेच बघ्यांच्या गर्दीमधील सर्वसामान्यांना आंदोलक म्हणून ताब्यात घेण्याचे प्रकार घडले केले. अशापद्धतीने जवळपास चारशे ते पाचशे जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. मुंबई पोलिसांच्या या कारवाईवर नागरिकांनी आक्षेप घेतले आहे.

शिवसेना भवनात आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांना तसेच तरुण-तरुणींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत होते; मात्र त्याच वेळी साध्या वेशात असलेल्या एका पोलिसालाच पोलिसांनी उचलून गाडीत बसवले होते. हा पोलिस कर्मचारी आपली पोलिस असल्याची ओळख असल्याचे सांगत होता. पण ताब्यात घेण्याची घाई असलेले वर्दीवरील पोलिस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिस वाहनाजवळ त्याने आपली ओळख सांगितल्यावर त्याची सुटका केली.

शिवाजी पार्क येथे आंदोलनात होणारी गर्दी पाहता, पोलिसांनी आपच्या सौम्या कोरडेसह मुंबईतील (Mumbai Police) आपच्या विविध कार्यकर्त्यांना घरी जाऊन अटक केली. याशिवाय बघ्यांची गर्दीतील सर्वसामान्यांना देखील कोणतेही कारण न देता ताब्यात घेतले गेल्याचे अनेकांचा आक्षेप आहे. ही हुकूमशाही आहे. आज आमच्यावर अशा प्रकारे कारवाई होत आहे. उद्या पोलिसांवरही अशी वेळ येऊ शकते. आम्ही या कारवाईचा निषेध करतो, असे स्थानिक अनुज मेहता यांनी सांगितले.

Mumbai Police
Nanded BJP Saree Distribution : अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत साडीवाटपावरून गोंधळ; दानवेंनी निवडणूक आयोगाला घेरले

हा एकप्रकारे अपहरणाचा प्रकार असल्याचे सांगत प्राची तळवळकर यांनीही कारवाईवर आक्षेप घेतला. दादरचे रहिवासी पंकज कामटे यांनी आंदोलनासाठी मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी आपण शिवाजी पार्क येथे आलो होतो; मात्र आपल्यावरही कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai Police
Abhijeet Dipke grandmother death : आजीचे निधन, अभिजीत दिपके गावी रवाना; CJP आंदोलनाबाबत मोठा निर्धार

दुसरीकडे परिसरात एका कार्यक्रमात केटरिंगच्या कामासाठी आलो होतो. तसे सांगूनही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कामगार नितीन गुप्ता यांनी सांगितले शिवाजी पार्क येथे रविवारी पोलिसांनी अनेक आंदोलकांवर कारवाई केली. अनेकांना ताब्यात घेण्यात आले. सायंकाळपर्यंत जवळपास चारशे ते पाचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com