Amruta Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Amruta Fadanvis News : अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह पोस्ट, सीए विरुद्ध गुन्हा दाखल..

Crime News : अतिषच्या प्रोफाईलवरून त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका ट्विटवर आक्षेपार्ह पोस्ट करणे एका सीएला चांगलेच महागात पडले. सायबर पोलिस ठाण्यात या सीए विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Amruta Fadanvis News) अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर टाकलेल्या फोटोला आतीष ओमप्रकाश काबरा (वय ३५,रा.नरहरी वसंत विहार, एसबीएच कॉलनी, ज्योतीनगर) याने टॅग करून फोटोवर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केली होती.

हा प्रकार भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतीष काबरा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. (Crime News) पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव करीत आहेत. (Amruta Fadanvis) अमृता फडणवीस सोशल मिडियावर कायम सक्रीय असतात. अनेक विषयांवर त्या आपली मते मांडतात, त्यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलही केले जाते.

परंतु त्याकडे दुर्लक्ष करत त्या आपल्या भूमिका समाज माध्यमांवर ठेवत असतात. अशाच एका ट्विटरवरील त्यांच्या पोस्टवर छत्रपती संभाजीनगर येथील सीए असलेल्या व्यक्तीने अश्लील आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. (Marathwada) हा प्रकार समजताच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत आतिष काबरा याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

यावरून सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी अतिषच्या प्रोफाईलवरून त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतली. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या तक्रारीवरून आतिष काबरा याच्याविरोधात भादंवि २९२, ५०९ सहकलम ६७, ६७ (अ) आयटी अॅक्ट २००० नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT