Pankaja Munde News : भाजपची डबा पार्टी पंकजा मुंडेना गतवैभव मिळवून देणार का ?

Bjp : जनतेचा आशीर्वाद व पाठिंबा आतापर्यंत जसा मिळाला तसा भविष्यातही महत्वाचा आहे, तो मिळेल अशी अपेक्षा.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama

Marathwada : गेली चार वर्ष कायम ज्यांच्या नाराजीच्या चर्चा राज्यभरात होत होत्या, राज्यातील नेत्यांशी फारसे सौख्य न राखता कायम मी राष्ट्रीय पातळीवर काम करते, मोदी-शहा माझे नेते आहेत, असे म्हणत नेतृत्व झुगारणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या बीड जिल्ह्यात जोरात कामाला लागल्या आहेत. (Pankaja Munde News) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने ३० मे ते ३० जून दरम्यान जनसंपर्क अभियान राबवण्यात आले.

Pankaja Munde News
Ashok Chavan News : अशोक चव्हाण पुन्हा नांदेड लोकसभा लढवणार ?

बीड जिल्ह्यात भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या मोहिमेत भाग घेतला. कार्यकर्त्यांशी फटकून वागण्याचा आरोप सातत्याने सहन करणाऱ्या पंकजा मुंडे काल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत डबा पार्टी करतांनाही दिसल्या.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काल झालेल्या कार्यक्रमात पंकजा यांच्या मनातील खदखद पुन्हा एकदा बाहेर आली. बीआरएस, एमआयएमसह इतर पक्षांकडून येणाऱ्या आॅफरवर त्यांनी भाष्य केले. (Beed News) मी त्या गांभीर्याने घेत नाही, पण कायम गांभीर्याने घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यातून त्यांनी पक्षश्रेष्ठींना सूचक इशारा दिला. अर्थात बीआरएस किंवा एमआयएम हा पंकजा मुंडे यांच्यासाठी पर्याय असूच शकत नाही, असे बोलले जाते. परंतु पक्षावर दबाव कायम राखण्याचा प्रयत्न पंकजा यांनी यातून केला असावा.

लोकसभा निवडणूक वर्षभरावर आली आहे. विद्यमान खासदार म्हणून बहिण प्रितम मुंडे यांना निवडून आणण्याचे आव्हान देखील पंकजा यांच्यासमोर पुढील काळात असणार आहे. या शिवाय स्वतःचे पुनर्वसन आणि गतवैभव प्राप्त करण्यासाठी देखील त्यांना रणनिती आखावी लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली असली तरी अद्याप टोकाचे पाऊल उचललेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास दाखवत पकंजा मुंडे कामाला लागल्या आहेत.

मोदी @9 महा जनसंपर्क अभियानाचा समारोप काल जिल्ह्यातील आष्टी येथे डबा पार्टीच्या बैठकीने झाला. यात खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, यांच्यासह पंकजा मुंडेही सहभागी झाल्या होत्या. आमदार सुरेश धस यांचीही उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात रेल्वेसह अनेक विकासाच्या योजना राबविता आल्या. आज केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला होत आहे. मंत्री असतांना जिल्ह्याच्या प्रत्येक गावात विकासाची कामे करता आली याचा आनंद आहे. जनतेचा आशीर्वाद व पाठिंबा आतापर्यंत जसा मिळाला तसा भविष्यातही महत्वाचा आहे, तो मिळेल अशी अपेक्षा व भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com