Minister Bhumre Viral Audio News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : माजला का ? तुझा बाप बोलतोय ; मुलावर आरोप होताच भुमरे भडकले...

Marathwada : जास्त शहाणपणा करू नको, तु तुझं पहाय, अशा शब्दात धमकावत भुमरे यांनी वाघ याला चांगलाच दम भरला.

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सामाज माध्यांवर व्हायरल होत आहे. यामध्ये आपल्या मुलाचे नाव घेवून आरोप करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भुमरे हे शिवीगाळ करून धमकावत असल्याचे स्पष्ट होते. (Sandipan Bhumre News) पैठण या भुमरेंच्या मतदारसंघातील दरकवाडी गावाच बाबासाहेब वाघ नावाचा राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता असल्याचे समजते.

काही दिवसांपुर्वी वाघ याने भुमरे यांचे शासकीय पीए मालपाणी यांना फोन करून गावात झालेल्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार व बोगस बिले बनवून पैसे उचलल्याचा आरोप केला होता. (Shivsena) हा आरोप करतांना वाघ याने संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास (बापू) भुमरे यांचे नाव घेतले होते. (Paithan) मुलाचे नाव घेतल्यामुळे खवळलेल्या भुमरेंनी बाबासाहेब वाघ याला फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावल्याचे या ऑडिओतून स्पष्ट होते.

मी तुझा बाप बोलतो, माजला का? मालपाणीला फोन कशाला केला होता ? बापूचं नाव कसं घेतलं, अशी विचारणा भुमरे यांनी संबंधित व्यक्तीकडे केली. (Marathwada) जास्त शहाणपणा करू नको, तु तुझं पहाय, अशा शब्दात धमकावत भुमरे यांनी वाघ याला चांगलाच दम भरला. भुमरे आणि वाघ या दोंघामधील संवादाची एक ऑडिओ क्लीप सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

यापुर्वी देखील भुमरे यांच्या अशा अनेक ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. राज्यातील सत्तांतरानंतर भुमरे यांच्यावर जेव्हा गद्दार म्हणून टीका केली जायची, तेव्हा एका `मधू` नावाच्या कार्यकर्त्याला ` मधू चांगल्या पोस्ट सोड़, मिरच्या झोंबल्या पाहिजे`, असा सवांद असलेल्या ऑडिओ क्लीपमुळे देखील भुमरेंची राज्यभरात चर्चा झाली होती. परंतु आज व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमध्ये जी भाषा मंत्री भुमरे यांनी वापरली आहे, ती पाहता त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT