Mla Pradnya Satav News : अशोक चव्हाण दोनशे टक्के मुख्यमंत्री होतील, सर्वाधिक जागाही काॅंग्रेसलाच..

Ashok Chavan : मराठवाड्यातील व्यक्तीने या राज्याचे नेतृत्व करावे, अशी माझी आणि प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्यांची व जनतेची देखील इच्छा आहे.
Mla Pradnya Satav News
Mla Pradnya Satav NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli : आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. (Mla Pradnya Satav News) या अतंरर्गत आज हिंगोलीत काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी माजी मुख्यमंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Mla Pradnya Satav News
Mla Kailas Patil News : जाहीरातबाज सरकारने शेतकऱ्यांच्या अनुदानात दीड हजार कोटींची केली घट..

शंभर टक्के नाही, तर दोनशे टक्के चव्हाण (Ashok Chavan) हे मुख्यमंत्री होतील आणि राज्यात सर्वाधिक विधानसभेच्या जागाही काॅंग्रेस पक्षच जिंकेल, असा दावा देखील सातव (Pradnya Satav) यांनी माध्यमांशी बोलतांना केला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काॅंग्रेसकडून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जागा वाटपा संदर्भात प्राथमिक बोलणी झाली असून काॅंग्रेसने हिंगोली मतदार संघावर देखील दावा सांगितला आहे.

या पार्श्वभूमीवर आज काॅंग्रेसच्या मराठवाड्यातील नेत्यांनी आढावा बैठक घेतली. (Hingoli) आमदार सातव देखील या बैठकीला उपस्थितीत होत्या. बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी उत्साहाच्या भरात अशोक चव्हाण यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. यावर त्या ठामही होत्या. अशोक चव्हाण हे या आधी राज्याचे मुख्यमंत्री होते. मराठवाड्यातील व्यक्तीने या राज्याचे नेतृत्व करावे, अशी माझी आणि प्रत्येक काॅंग्रेस कार्यकर्त्यांची व जनतेची देखील इच्छा आहे.

राज्यात काॅंग्रेसला चांगले वातावरण आहे, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसच्या जागा वाढतील आणि अशोक चव्हाण हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार सातव यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये हिंगोली मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार आहे.

हेमंत पाटील जे आता शिंदेंसोबत गेले असले तरी ठाकरे गटाचा या जागेवरील दावा कायम आहे. पण हिंगोलीत काॅंग्रेसची ताकद, संघटन अधिक असल्याचे सांगत त्यांनी देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे हिंगोली मतदारसंघ नेमका कोणाच्या वाट्याला येतो? याबद्दल उत्सूकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com