Anjali Damania On Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Anjali Damania On Sanjay Shirsat : जे घरात न्याय देऊ शकत नाहीत, ते सामाजिक न्याय मंत्री होण्यास लायक नाहीत! दमानिया यांचा संताप

Activist Anjali Damania criticizes Minister Sanjay Shirsat, stating that one who cannot deliver justice at home is unfit to serve as the Minister of Social Justice. : सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambahjinagar : सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ? हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात? घरची प्रकरणे ही सगळ्यांची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारिरीक छळ, फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचे गंभीर आरोप केले होते. वकीलामार्फत सदर महिलेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती.

असे असताना तक्रारदार महिलेने 48 तासात सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मागे घेत असल्याचे जाहीर केले. हे माझे पर्सनल मॅटर आहे, ते मी क्लोज करत आहे. माझी कोणतीही तक्रार नाही, वकीलामार्फत बजावलेली नोटीसही मी मागे घेत असल्याचे सदर महिलेने एका वृत्तवाहिनीवर येऊन जाहीर केले. (Anjali Damania) यानंतर सदर महिलेवर मंत्री संजय शिरसाट यांनी दबाव आणल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर संताप व्यक्त करत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरच निशाणा साधला. या संदर्भात एक्स या आपल्या पेजवरून दमानिया यांनी एक पोस्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. सामाजिक न्याय मंत्री, जे त्यांचा घरात न्याय करत नाहीत, ते महाराष्ट्राच्या समाजासाठी काय खाक न्याय मिळवून देणार ? हे माझा वैयक्तिक प्रकरण? असे ते म्हणूच कसे शकतात?

घरची प्रकरणे ही सगळ्यांची वैयक्तिकच असतात. पण त्यात त्या मुलींचा छळ होणं आणि तिला न्याय मिळवून देणे हा सामाजिक मुद्दा नाही का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. तिने दिलेली कायदेशीर नोटीस मागे घेण्यात आली ह्यावरून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे हे स्पष्ट दिसतयं.

ब्लेड ने स्वत:ला कापून, स्वत:वर बंदुक लावून मी आत्महत्या करेन, अशी धमकी देऊन, त्या मुलीला लग्न करायला भाग पाडलं, लग्नानंतर गर्भपात करायला लावणे, आणि नंतर माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदेंचा उजवा हात आहेत, असे म्हणून तिला धमकावून वाऱ्यावर सोडलं, अशा मुलाला शिक्षा न देता त्या मुलीवर दबाव आणणं हा ‘सामाजिक न्याय मंत्र्यांचा’ न्याय आहे का?, असा सवाल दमानिया यांनी केला आहे. ह्या सामाजिक मंत्री मंत्रीपदाला हे लायक नाहीत. एकनाथ शिंदेंनी ह्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे, असेही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT