Siddhant Shirsat : शिरसाटांच्या मुलावर आरोप केलेल्या महिलेचे 48 तासातच घुमजाव; मॅटर क्लोज करत असल्याची घोषणा!

The woman who accused Siddhant Shirsat has officially withdrawn her complaint, publicly stating that she is retracting the allegations. : आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून वैयक्तिक, कौटुंबिक वादाला सार्वजनिकरित्या चव्हाट्यावर आणून राजकारण केले जात असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला.
Siddhant Shirsat Allegation News
Siddhant Shirsat Allegation NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : प्रत्येकाच्या कुटुंबात काहीतरी वाद असतात, तसेच माझे आहेत. हा माझा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे. समाज माध्यमावर तो यावा, त्यावर चर्चा व्हावी हे अत्यंत चुकीचे आहे. मी कोणाकडेही न्याय मागण्यासाठी गेले नव्हते, कायदेशीर प्रक्रियेद्वारे पुढे जात असताना या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी होत आहे. त्यामुळे मी माझी तक्रार मागे घेत आहे, आतापासून या विषयाला मी फूलस्टाॅप लावला असल्याचे तक्रारदार महिलने घोषित केले.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिध्दांत शिरसाट यांच्याविरोधात एका महिलेने शारिरीक छळ, फसवणूक, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. सिद्धांत शिरसाट यांच्याशी विवाह झाल्याचा दावा करत ते आता मला नांदवायला तयार नाहीत, अशी तक्रार आणि वकिलांमार्फत नोटीस सदर महिलेने सिद्धांत शिरसाट यांना पाठवली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

विरोधी पक्षांनी संजय शिरसाट हे मंत्री असल्याचा गैरवापर करून सदर महिलेवर दबाव आणत आहेत. मुंबईच्या नेहरुनगर पोलीसांनी तिच्या तक्रारीची दखल घेतल नाही. (Crime News) महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन पिडित महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी लावून धरली. हे प्रकरण शिरसाट पिता-पुत्रांना अडचणीत आणणार असे वाटत असतानाच तक्रारदार महिलेने एक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत आपण हा विषय संपवत आहोत.

Siddhant Shirsat Allegation News
Sanjay Shirsat News : माझ्या मतदारसंघात मोठ्या लोकांच्या जमिनी; संजय शिरसाट यांनी नावचं घेतली!

आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्या वैयक्तिक, कौटुंबिक वादाला सार्वजनिकरित्या चव्हाट्यावर आणून राजकारण केले जात असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला. मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल आपली कोणतीही तक्रार नाही, आम्ही हे प्रकरण वैयक्तिक पातळीवर मिटवणार आहोत. मी माझ्या वकिलांना देखील या प्रकरणात पुढे काहीही करायचे नाही, हे प्रकरण आजच संपले हे मी सांगितले आहे, असेही संबंधित महिलेने स्पष्ट केले आहे. न्यायालयात आपण या बाबतचे शपथपत्र देणार आहोत, असेही तिने सांगितले.

Siddhant Shirsat Allegation News
Sanjay Shirsat News : कामगारांना साहित्य वाटपात घोटाळा! माझ्या पीएला सांगलीहून फोन

काय आहे नेमकं प्रकरण?

कॅबिनेट मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नामक महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावत, सिद्धांत यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली होती.

Siddhant Shirsat Allegation News
Shivsena Eknath Shinde Party : शिंदेंच्या शिवसैनिकांना गुंडांकडून मारहाण

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ओळख सिद्धांत शिरसाट यांच्याशी 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांमध्ये संबंध वृद्धिंगत झाले व चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटी, तसेच शारीरिक संबंध झाले. सिद्धांत यांनी वारंवार आत्महत्येची धमकी देऊन भावनिक ब्लॅकमेल करत तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकला आणि सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून लग्न केल्याचा आरोपही महिलेने केला.

Siddhant Shirsat Allegation News
Chhatrapati Sambhajinagar Water Issue : संभाजीनगरच्या पाणी योजनेची कासवगती, सावे-इम्तियाज यांचा प्राधिकरणाचा आग्रह नडला!

14 जानेवारी 2022 रोजी दोघांचे बौद्ध पद्धतीने लग्नही झाले असून त्याचे पुरावे संबंधित महिलेच्या ताब्यात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेचा गर्भधारणाही झाली होती, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही या नोटीसमध्ये करण्यात आला. लग्नानंतर सिद्धांत यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांचे आधीचे विवाह संबंध, तसेच इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली.

Siddhant Shirsat Allegation News
Vaishnavi Hagwane : वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाची हयात तुरुंगातच जाणार! CM फडणवीस ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत

जर तू पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करीन, अशा स्वरूपाच्या धमक्याही देण्यात आल्याचे आरोप या महिलेने केले होते. 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये संबंधित महिलेने तक्रार दाखल केली होती. मात्र सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला.

Siddhant Shirsat Allegation News
Vaishnavi Hagawane Breaking : सर्वात मोठी बातमी, अखेर सात दिवसांनंतर वैष्णवीचे फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि दीराला अटक

महिलेच्या वकिलांनी सात दिवसांच्या आत सिद्धांत शिरसाट यांनी तिला नांदविण्यासाठी घरी घेऊन यावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूचित केले आहे. ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com