Anjali Damania 4 Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : मंत्री आठवलेंना अंजली दमानियांनी ऐकविला 'व्हॉईस मेसेज'; 'मोठी' मागणी करताना व्यक्त केली 'ही' भीती, पण...

Anjali Damania Union Minister Ramdas Athawale Beed Santosh Deshmukh murder case : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड इथं सरकारी विश्रामगृहावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट घेत चर्चा केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडच्या राजकारणातील गुन्हेगारीविरोधात अन् संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतल्यानंतर दमानिया यांनी त्यांना आलेला व्हॉईस मेसेज ऐकवला.

याचबरोबर त्यांनी मंत्री आठवलेंजवळ आपल्याला खोटं ठरवण्याचा कट रचला जात असल्याचा दावा केला.

राज्यातील राजकारणात घुसलेल्या गुन्हेगारीविरोधात अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी काल बीडमधून सत्यशोधक आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत उभ्या राहून, बीडमधील गुन्हेगारीच्या तक्रारी गोळा करणार आहेत. तसेच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील त्या ठाम आहे.

बीडमधील (BEED) संतोष देशमुख यांच्या हत्येतील पसार तिघा आरोपींची हत्या झाली असून, त्यांचे मृतदेह कर्नाटकच्या सीमालगत भागात पडले आहेत, असा व्हाईस मेसेज अंजल दमानिया यांना आला होता. हा मेसेज त्यांनी लगेच बीडचे पोलिस अधीक्षक यांना पाठवला. खात्री करून घेण्याची विनंती केली. तसेच माध्यमांमध्ये देखील यावर प्रतिक्रिया दिली. बीड पोलिसांनी याची खात्री केल्यावर, दारूच्या नशेत एकाने चुकीचा मेसेज केल्याचे समोर आले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले काल उशीरा बीड दौऱ्यावर होते. बीडच्या सरकारी विश्रामगृहावर मंत्री आठवले आले असता, त्यावेळी अंजली दमानिया यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दमानिया यांनी त्यांना आलेला व्हॉईस मेसेज आठवलेंना ऐकवला. हा मेसेज आठवले यांनी ऐकला. यावेळी अंजली दमानिया यांनी हा मेसेज पुढे पोलिस तपासात खोटा निघाल्याचे सांगितले. तसंच असे फेक मेसेज पाठवून मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी केला.

मात्र कितीही खोट ठरवण्याचा प्रयत्न केला, तरी मी लढत राहणार, असे सांगून दमानिया यांनी मंत्री आठवले यांना आपणही यात लक्ष घाला, अशी मागणी केली. मंत्री आठवले यांनी यावर संपूर्ण सहकार्य असेल, असे आश्वासन दमानिया यांना दिले.

दरम्यान, अंजली दमानिया आज परळी आणि गंगाखेड इथं जाणार असून, तिथं सोर्स मार्फत माहिती घेणार आहेत. आवश्यक तेवढी माहिती न मिळाल्यास गंगाखेड किंवा परळीत मुक्कामी राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT