Ashok Chavan News, Maharashtra Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : घोषणाबाज, जुमलेबाज अन् इव्हेंट मॅनेजमेट सरकारवर हक्कभंग आणणार..

सरकारनामा ब्युरो

Nanded : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. येत्या १७ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan News) महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने विधानसभेत लक्षवेधी मांडूनही या विषयाकडे दुर्लक्ष केले.

३१ मार्चपर्यंत कर्जमाफी करून शेतकऱ्यांना पैसे पोच करू, असे आश्वासन दिले. मात्र, सहकार विभागाने याबाबत ताळमेळ आणि हिशोब केला नाही. (Ashok Chavan) त्याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार देण्याची घोषणा झाली, पण अजूनही पैसे मिळाले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी हा हक्कभंग असेल, (Congress) असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सरकार फक्त आश्वासने देत आहे. वर्षपूर्ती झाली पण वर्षभरात फक्त घोषणा, इव्हेंट मॅनेजमेंट आणि जुमलेबाजी सुरू आहे. (Nanded) जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होत आहे. समाजात, गटागटात तणाव, अशांतता निर्माण करून सामाजिक धुव्रीकरणाचे काम सुरू आहे. मतपेटीच्या दृष्टिकोनातून राज्यात सुरू असलेली सामाजिक अशांतता कधीही पहायला मिळाली नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. राज्यात चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कुणाचाच धाक राहिला नाही. न्याय देण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. मराठा आरक्षण, पदोन्नतीसह अनेक प्रश्नांवर सरकार चिडीचूप आहे. नांदेडला अजूनही अपेक्षित पाऊस नसल्याचे सांगून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीही कमी झाली आहे. पावसाला विलंब झाल्यामुळे पेरणीचे वेळापत्रक कोलमडले आहे. शेतीच्या उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम होणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनाने तातडीने आढावा घेऊन सकारात्मक पावले उचलून तत्काळ मदत केली पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले. बोंढार येथील अक्षय भालेराव याची हत्या तसेच देळूब येथील दिव्यांग मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपीविरूद्ध कठोर कारवाई होऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी चव्हाण यांनी यावेळी केली.

आम्ही नांदेडला काय दिले यावर टिका करणाऱ्या विरोधकांचा चव्हाण यांनी समाचार घेतला. तुम्ही नांदेडला आणलेली कार्यालये पळविण्याचा घाट घातला. आम्ही नांदेडला काय दिले हे जनतेला माहिती आहे. तुम्ही आत्तापर्यंत नांदेडला काय दिले, ते आधी सांगा? असा प्रतीप्रश्नही केला. तसेच नांदेडच्या विकासासाठी दीडशे कोटीचा निधी आणला तसेच व्यापारी संकुलाला आणलेली परवानगीला स्थगिती देण्याचा सपाटा तुम्ही लावला होता.

आम्हाला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागली. त्यामुळे तुमचे सरकार हे स्थगिती सरकार असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. राज्यात बीआरएसची हवा असली तरी ती भाजपची बी टीम असल्याचा टोल चव्हाण यांनी लगवाला. तेलंगणमध्ये काय चालले आहे याची माहिती घ्या असे सांगतानाच वंचित आघाडीची शिवसेनेसोबत बोलणी सुरू असल्याचे ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT