Shivsena : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे, आम्हाला मराठवाड्यात तुमच्या सारखा एक नेता मंत्री करायचा आहे. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, मी शंभर टक्के मंत्री होणारच, असा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला. (Mla Santosh Bangar News) हिंगोली येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बांगर यांनी हा दावा केला.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे कायम आपल्या विविध कारनाम्यांमुळे चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्याला कोंडून ठेवले म्हणू, तर कधी कुणाच्या कानाखाली लगावली म्हणून बांगर राज्यभरात चर्चिले गेले आहेत. (Hingoli) शिंदे गटाच्या बंडात अगदी विश्वासदर्शक ठरावापर्यंत ठाकरे गटासोबत होते.
मात्र विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी बांगर शिंदे गटासोबत जावून बसल्याने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. (Marathwada) आता बांगर यांनी स्वतःच थेट मी मंत्री होणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अनेक दिल्ली वाऱ्या करून देखील या मंत्रीमंडळ विस्ताराला काही हिरवा कंदी मिळत नाहीये.
त्यातच शिंदे गटातील पाच विद्यमान मंत्र्यांना हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याच्या चर्चा होत्या. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रा. तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या रांगेत असलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत कोणत्याच मंत्र्याचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
काहींच्या मंत्रीपदाव टांगती तलवार आहे, मंत्रीमंडळ विस्ताराला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, इच्छुकांची यादी मोठी असतांना आता त्यात आमदार संतोष बांगर यांनी आपले नाव देखील जोडले आहे. त्यामुळे मराठवाड्याला आणखी एक मंत्रीपद मिळणार का? मिळाले तर ते शिरसाटांना? की संतोष बांगरांना याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.