Mla Kailas Ghadge Patil, News Osmanabad Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : आमदार पाटलांच्या उपोषणाचे दुसरे यश, अतिवृष्टीच्या नुकसानीचे ६० कोटी मंजूर..

आपल्या आंदोलनानंतर ज्या गतीने प्रलंबित वीमा व अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली हिच गती दिवाळीपूर्वी ठेवली असती तर माझ्या शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड झाली असती. (Mla Kailas Patil)

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत केलेल्या सात दिवसांच्या आमरण उपोषणाचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत. जिल्ह्यातील दोन लाख अतिरिक्त शेतकऱ्यांचा पीक विमा यादीत समावेश झाल्यानंतर आता सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्याला ६० कोटी रुपये मंजुर झाले आहेत.

आमदार कैलास पाटील (Mla Kailas Ghadge Patil) यांनीच ही माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली. आपल्या आंदोलनाचे हे दुसरे यश असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे. (Osmanabad) जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

आपल्या आंदोलनातून अतिवृष्टीची ५९.८७ कोटी व सततच्या पावसाची २२२ कोटी रुपयांची भरपाई लवकर मिळण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादा दरम्यान त्यांनी अतिवृष्टीचा अध्यादेश काढण्याचा आणि सततच्या पावसासाठी मंत्रिमंडळ उपसमीतीची बैठक घेण्याचा शब्द दिला होता.

त्यानुसार आज अतिवृष्टीच्या नुकसानीचे ५९.८७ कोटी रुपये मंजूर केल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. सततच्या पावसाचे उर्वरित २२२ कोटी रुपयांसाठीचा आपला पाठपुरावा सुरु आहे. तीही मदत लवकरच मिळवून घेऊ.

आपल्या आंदोलनानंतर ज्या गतीने प्रलंबित वीमा व अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली हिच गती दिवाळीपूर्वी ठेवली असती तर माझ्या शेतकऱ्यांचीही दिवाळी गोड झाली असती, अशी प्रतिक्रियाही पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT