Shivsena : ठाकरेंचा धसका, दौरा जाहीर होताच सत्तारांकडून खासदार शिंदेच्या सभेचे नियोजन..

आता हा खरचं योगायोग आहे ? की मग आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा होवूच नये यासाठी खेळलेली चाल हे लवकरच स्पष्ट होईल. (Minister Abdul Sattar)
Abdul Sattar-Shrikant Shinde- Aditya Thackeray News, Aurangabad
Abdul Sattar-Shrikant Shinde- Aditya Thackeray News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये येवून शिवसंवाद यात्रा घेऊन दाखवा असे दिलेले आव्हान युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वीकारले. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ते सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये मेळावा घेणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात नुकतीच माहिती दिली होती. ठाकरेंचा दौरा जाहिर होताच आव्हान देणाऱ्या सत्तारांनी त्याचा धसका घेतला की काय? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण ७ नोव्हेंबर रोजी सत्तार यांनी सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.

Abdul Sattar-Shrikant Shinde- Aditya Thackeray News, Aurangabad
Shivsena : आदित्य ठाकरेंनी सत्तारांचे आव्हान स्वीकारले, पण पेलणार का ?

या सभेच्या पुर्वतयारीसाठी उद्या (ता.३) सत्तार मतदारसंघात पुर्वतयारीची बैठक घेणार आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या दौऱ्याची घोषणा होवून २४ तास उलटत नाही तोच सत्तारांनी ही नवी खेळी केल्याने त्यांनी ठाकरेंच्या दौऱ्याचा धसका घेतला का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. (Abdul Sattar) यावर खासदार शिंदे यांचा हा दौरा पुर्वनियोजितच होता, भाऊबीजे निमित्त त्यांच्या उपस्थितीत सिल्लोडमध्ये कार्यक्रम घेण्याचे ठरले होते, पण तारीख निश्चित झाली नव्हती. आता त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी येण्याचे मान्य केल्याचे सत्तार समर्थकांकडून सांगितले जात आहे.

आता हा खरचं योगायोग आहे ? की मग आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा होवूच नये यासाठी खेळलेली चाल हे लवकरच स्पष्ट होईल. गेल्या काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यातील शाब्दिक चकमकी झडत आहेत. सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी सिल्लोड मध्ये शिवसंवाद यात्रा काढून दाखवावी असे आव्हान दिले होते.

आता आदित्य यांनीसुद्धा सत्तारांचे आव्हान स्वीकारले आहे. येत्या ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा काढत मेळावा घेणार आहेत, इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरे हे औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात देखील शेतकरी मेळावा घेणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली आहे.

आज राजकीय वर्तुळात याची दिवसभर चर्चा सुरू असतांनाच सायंकाळी सत्तारांकडून देखील आदित्य ठाकरेंच्या नियोजित दौऱ्यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहेत. खासदार एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याची कुठलीही चर्चा नसतांना नेमका आदित्य ठाकरेंचा दौरा झाल्यावरच तो कसा आखण्यात आला याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात उद्या, कृषीमंत्री अब्दुल सत्तार सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com