Antarwali Sarati Stone Pelting  Sarkarnama
मराठवाडा

Antarwali Sarati News: दगडफेक करणाऱ्या बेदरेला जालना जिल्ह्यात 'नो एन्ट्री'; न्यायालयाने..

Antarwali Sarati News: बेदरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Mangesh Mahale

Jalna News: अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील हिंसाचार प्रकरणामध्ये बीडच्या गेवराई येथील ऋषिकेश बेदरे याच्यासह अन्य तिघा जणांना अंबड पोलिसांनी अटक केली होती. आज (गुरुवार) औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून ऋषिकेश बेदरे याला अटी शर्तीवर जामीन देण्यात आला आहे.

ऋषिकेश बेदरे याला बीड आणि जालना जिल्ह्यात पुढील 90 दिवस येण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. जर बेदरे याला बीड किंवा जालना जिल्ह्यातील एखाद्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा असेल, तर पोलिस प्रशासनाची परवानगी घेऊनच त्याला जावे लागणार आहे, या अटीवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अंतरवली सराटी येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना समोर आली होती. या प्रकरणी ऋषिकेश बेदरेसह शनी सिरसट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना न्यायालीन कोठडी सुनावली होती. आज बेदरे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अटक केली तेव्हा बेदरे याच्याकडे गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसं जप्त केली होती. अंतरवाली सराटी येथील दगडफेक करण्याचा आरोप बेदरे याच्यावर आहे. कट रचून जीवे मारण्याच्या हेतूने दगडफेक केली, असा गुन्हा त्याच्यावर गोंदी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT