Sangli News: वारणा उद्‌भव योजनेचा मुद्दा पेटणार; शेतकरी संतप्त

Sangli Politics:भविष्यात हा वाद पेटण्याची चिन्हे
Sagli Corporation
Sagli CorporationSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस पेटतच चालला आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यातील तालुके दुष्काळाच्या झाडा सोसत असताना सांगली शहर, मिरज आणि कुपवाडचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे धडपड सुरू आहे. सध्या या तीन शहराला कृष्णा नदीतून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र प्रदूषणाचे कारण देत वारणा नदीतून मिरज तालुक्यातील समडोळी येथून पाणी उचलण्याचा प्रस्ताव तयार होणार आहे. मात्र त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध केला असून भविष्यात हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

सांगली शहर, कुपवाडसाठी सांगली महापालिकेने वारणा उद्‍भव पाणी योजना राबविण्याचा घाट घातला आहे. या योजनेमुळे वारणा नदीकाठावरील हजारो एकर शेतीचे नुकसान होणार असून आधीच अडचणीत आलेले शेतकरी देशोधडीला लागतील. या योजनेनुसार दहा किलोमीटरवर असणाऱ्या समडोळी येथून पाणी उचलण्यात येईल. समडोळी येथे छोटा बंधारा बांधून तेथून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जाणार आहे.

Sagli Corporation
Dharashiv News: 'धाराशिव' साठी 'दादागिरी' नंतर आता शिवसेनेने ठोकला शड्डू...

‘वारणा उद्‌भव’ असे योजनेचे नाव आहे. तत्कालीन मंत्री दिवंगत मदन पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता.पुन्हा योजनेसाठी उचल खाल्ली आहे. सांगलीतील नागरिकांना वारणेतून पाणी आणायचे की थेट चांदोलीतून, यावरून वादविवाद सुरू आहे. वारणेतूनचं पाणी आणायचेच, असा हट्ट सांगलीकरांनी धरला आहे.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचा फटका सांगली जिल्ह्याला बसतो. जिल्ह्यातील तालुक्यात ऐन पावसाळ्यातच पाणी पाहण्याची वेळ येते. तर उन्हाळ्यात त्याच्या तीव्र झळा सांगलीकर सोसतात. त्यात पाऊस कमी झाला तर सगळ्यात आधी फटका बसतो तो शेतकऱ्यांना. उपसाबंदी लगेच लागू केली जाते. पिके वाळून नुकसान होते. शेतकरी कशीबशी ‘वारणे’च्या पाण्यावर गुजराण करीत आहे.

त्यात महापालिकेने वारणा उद्‌भव योजना राबवली तर सांगली व कुपवाडसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसावे लागणार आहे. शेतीला पाणी कमी पडण्याचा धोका आहे. परिणामी शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारणेतून पाणी उपसा करण्याऐवजी जर कृष्णा नदी स्वच्छ केली तर पैशांची बचत होईल, कामही लवकर होईल. अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

Sagli Corporation
Chhagan Bhujbal: बीडमध्ये दंगल घडविणारी माणसं जरांगेंचीच; भुजबळांचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com