Jalna Political : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना २०१४ मध्ये मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वाॅटर ग्रीडची (Marathwada Water Grid) घोषणा करण्यात आली होती. या योजनेला गती मिळत असतांनाच २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आली आणि त्यांना या योजनेला स्थगिती दिली.
फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री (Babanrao Lonikar) असलेल्या लोणीकरांना ही वाॅटर ग्रीड सुरू करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा, पत्र व्यवहार केला. पण ती काही आघाडी सरकारच्या काळात सुरु होवू शकली नाही. (Jalna) आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा वाॅटर ग्रीड योजनेला गती देत जालना व बदनापूर मतदरासंघातील ३२६ गावांच्या योजनेला तत्वतः मान्यता दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केल्यानंतर आज माजी मंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेत अर्जून खोतकर यांनी भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जालना-बदनापूर विधानसभा मतदारसंघातील या योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. यावरून आता भाजप व शिंदे गटातच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परतूरचे भाजप आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मराठवाडा वाॅटर ग्रीड आणण्यात महत्वाचे योगदान होते.
त्यांनी इस्त्राईलचा दौरा करून या योजनेचा अभ्यास देखील केला होता. मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही योजना असल्यामुळे लोणीकरांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांकडे वेळोवेळी भेटून या ग्रीडला मान्यता देण्याची विनंती व पत्रव्यवहार केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर देखील लोणीकरांनी फडणवीसांची भेट घेऊन ग्रीडला मंजुरी देण्याची विनंती केली होती.
त्याची जालन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणीकरांच्या नावाचा उल्लेख करत घोषणा केली. परंतु माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी आपण व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत ही ग्रीड मंजुर करून घेतल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे चित्र आहे. खोतकरांनी टायमिंग साधत वाटरग्रीडचे श्रेय आपलेच असल्याचे सांगत लोणीकरांवर कुरघोडी केल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.