Marathwada : शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला दिवाळीपासून भाव मिळत नाही, त्यामुळे वेचणी पासून कापूस घरातच साठवून ठेवला आहे. शासनकर्त्यानो आतातरी जागे व्हा, असे आवाहन करणारी पाच हजार पत्र सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवली आहेत. शनिवारी सोयगावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना पोस्टाने पत्र पाठवले आहे.
मराठवाड्यात कापूस उत्पन्नात अग्रेसर असलेल्या सोयगाव तालुक्यात लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात साठवून ठेवला आहे. या पांढऱ्या सोन्याला भावच मिळत नसल्याने (Farmers) शेतकरी हताश झालेला आहे. भाजपचे मयूर मनगटे यांच्या कल्पकतेतुन सोयगाव शहरातील तब्बल पाच हजार शेतकऱ्यांनी पोस्टद्वारे पत्र पाठवून आपल्या व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना कळवल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, बाजार भाव घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या विषयाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या व्यथा समजून घ्या, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.
तालुक्यातील ८४ गावातून या उपक्रमाला सोमवार पासून सुरुवात करून तालुक्यातील प्रत्येक गावातून मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे भाजपचे मयूर मनगटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाच हा मतदारसंघ आहे. कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मंत्र्यांनाच साकडं घालण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या या उपक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.