Ex. Minister Arjun Khotkar-Uddhav Thackeray News, Jalna
Ex. Minister Arjun Khotkar-Uddhav Thackeray News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar : बाळासाहेबांचे नाव मिळाले, आमच्यासाठी हीच खूप मोठी गोष्ट..

सरकारनामा ब्युरो

जालना : निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयामुळे आता शिवसेनेचे दोन पक्ष झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची (Shivsena) शिवसेना असे हे दोन पक्ष असणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यात कालपासून जल्लोष सुरू आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला अद्याप चिन्ह मिळालेले नाही. परंतु बाळासाहेबांचे नाव मिळाल्याने शिंदे गट आमचाच विजय झाल्याचा दावा करत आहे.

माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी `बाळासाहेबांचे नाव मिळाले यातच आमचा विजय` असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Jalna) खोतकर म्हणाले, आमच्यासाठी बाळासाहेबांचे नावच काफी आहे, या नावाच्या जोरावरच आम्ही राज्यात पुन्हा एकदा बाळासाहेबांचे विचार घराघरात पोचवण्यात यशस्वी होवू. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगाने अगदी योग्य पद्धतीने लावला आहे.

एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम करत आहेत. आता अधिकृतपणे पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाल्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेचीच हे देखील स्पष्ट झाले आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असेही खोतकर म्हणाले.

शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झाले, पण खरी शिवसेना कोणाची? याचा पेच काही सुटत नव्हता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, घटनापीठ स्थापन होऊन सुनावणी सुरू झाली. पण पक्षाचे चिन्ह आणि नावाचा चेंडू सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणुक आयोगाच्या कोर्टात टाकला होता. अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेतील वादावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक होते.

त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव तात्पुरते गोठवले आणि दोन्ही पक्षांना नव्या नावांसह चिन्हांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेची ओळख असलेले चिन्ह गमावण्याचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दुःख असले तरी, आता निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करत नवे चिन्ह आणि नाव स्वीकारून पुढे जावे लागणार आहे.

त्यामुळेच त्यांच्याकडून जल्लोष आणि नवे चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्याने आपला विजय झाल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT