Aurangabad : औरंगाबादेत मशाल चिन्हानेच शिवसेनेला दिला होता पहिला खासदार..

लोकसभा निवडणुकीत याच चिन्हाने शिवसेनेच्या लोकसभेतील विजयाची द्वारे खुली केली होती. खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या विजयाची मशाल तेव्हाच पेटली होती. ( Shivsena, Aurangabad)
Let. Moreshwar Save News, Auragnabad
Let. Moreshwar Save News, AuragnabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे गेला. उध्दव व शिंदे या दोन्ही गटांनी आमची (Shivsena) शिवसेना खरी असा दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना नावाचा वापर करण्यास मज्जाव करत तात्पुरते चिन्ह गोठवण्याचा निर्णय नुकताच दिला होता. अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे तात्पुरता हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले आहे. धनुष्यबाण गेल्यानंतर मिळालेले मशाल हे कधीकाळी शिवसेनेचे चिन्ह होते. आणि (Aurangabad) औरंगाबादेत याच मशालीने शिवसेनेला पहिला खासदार निवडून दिला होता.

१९८९ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने मोरेश्वर सावे यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा त्यांची निशाणी मशालच होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तेव्हा मशाल चिन्हावरच मते मागितली होती.

लोकसभा निवडणुकीत याच चिन्हाने शिवसेनेच्या लोकसभेतील विजयाची द्वारे खुली केली होती. खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या विजयाची मशाल तेव्हाच पेटली होती याची आठवण या निमित्ताने होत आहे. मशाल या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर १९९८ चा अपवाद वगळता २०१९ पर्यंत औरंगाबाद लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा कायम फडकत राहिला होता.

Let. Moreshwar Save News, Auragnabad
Abdul Sattar : सत्तारांचा आवाज टाईट, का त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पीएला टाईट मारली ?

१९९६ च्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर प्रदीप जैस्वाल खासदार झाले होते. त्यानंतर ९८ मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काॅंग्रेसचे रामकृष्ण बाबा पाटील हे विजयी झाले होते. या पराभवानंतर मात्र १९९९ ते २०१४ अशा सलग चार लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता.

२०१९ मध्ये मात्र इथे आश्चर्यकारकरित्या एमआयएमने विजय मिळवला. त्यामुळे सर्वाधिक काळ धनुष्यबाण चिन्हासह लढलेल्या शिवसेनेसाठी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी मशाल चिन्ह नवे नाही. या निमित्ताने पुन्हा एकदा उद्धव सेनेच्या हाती मशाल आली, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com