Dhule cash controversy, arjun khotkar Sarkarnama
मराठवाडा

Arjun Khotkar Controversy : शिंदेंच्या आमदारांच्या अडचणी थांबता थांबेनात, ठाकरेंच्या नेत्याच्या याचिकेनंतर पीए विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Bhaskar Jadhav Allegation On Arjun Khotkar : "आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या धुळे गुलमोहोर विश्रामगृहातील कक्ष क्रमांक 102 सापडलेले पैसे पीएचे नसून ते ज्या आमदाराकडे काम करतात त्या आमदाराचे आहेत. साडेपाच कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील शिल्लक 1.84 कोटी त्या आमदाराच्या वाट्याचे होते..."

Sampat Devgire

Dhule News, 12 Jul : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. गेले महिनाभर चर्चेत असलेल्या वादग्रस्त 1.84 कोटी रुपयाची रोकड कुणाची? यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

खोतकर यांच्या स्वीय सहाय्यक विरोधात धुळे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा चांगलाच गाजतो आहे. दौऱ्यात समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे पीए अनिल पाटील यांच्या कक्षात 1.84 कोटी रुपयांची रोकड सापडली होती.

याबाबत आता अनिल पाटील आणि वाहनचालक राजकुमार मोगले यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनीही उडी घेतली आहे. संजय शिरसाट यांच्या व्हिडिओत पैशाने भरलेली बॅग आढळली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले.

आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांच्या धुळे गुलमोहोर विश्रामगृहातील कक्ष क्रमांक 102 सापडलेले पैसे पीएचे नसून ते ज्या आमदाराकडे काम करतात त्या आमदाराचे आहेत. साडेपाच कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील शिल्लक 1.84 कोटी त्या आमदाराच्या वाट्याचे होते, असे भास्कर जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांच्या याचिकेनुसार न्यायालयाने या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार काल दिवसभर पोलिसांची धावपळ सुरू होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये अनिल पाटील आणि राजकुमार मोगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

पोलिसांवर या प्रकरणाचा तपास करताना मंत्रालयातील यंत्रणा आणि राजकीय दबाव होता. त्यामुळेच पोलिसांनी दोन महिने तपासाचे नाटक केले. त्यानंतर या प्रकरणात एनसी दाखल करण्याचा हास्यास्पद प्रकार झाला. यामध्ये गृहखात्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, असे माजी आमदार गोटे म्हणाले.

या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संबंधित रोकड कोणाकडून मिळाली याची माहिती पीए अनिल पाटील यांना द्यावी लागणार आहे. ती कोणासाठी होती याचाही तपास होईल. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप न झाल्यास आमदार खोतकर यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतात का? याची आता प्रतीक्षा आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तीन आमदार विविध कारणांमुळे वादात सापडले आहेत. मंत्री संजय शिरसाठ यांच्या व्हिडिओत पैशाने भरलेली बॅग होती. हा व्हिडिओ समाज माध्यम आणि वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पक्षाच्या अडचणी आणि डोकेदुखी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT