Maharashtra Assembly Election 2024 : गुंडगिरी आणि दडपशाही कोण करतो, हे जालनेकारांना ठाऊक आहे. खोतकर परिवार हा निर्व्यसनी, माळकरी आणि वारकरी आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीची आमच्या कुटुंबाची नियमित परंपरा आहे, अशा शब्दात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.
महायुतीचे उमेदवार खोतकर यांनी शुक्रवारी (ता.आठ) राममूर्ती, मजरेवाडी, शिंधी काळेगाव, साळेगाव घारे, सोमनाथ, जळगाव तांडा, पिरकल्याण कल्याण सीड इत्यादी ग्रामीण भागातील गावाचा दौरा केला. (Jalna) खरा शिवसैनिक हा हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे. त्याने कधीच आयुष्यात पंजाला मतदान केलेले नाही. त्यामुळे ते कुणाच्याही आमिषाला बळी न पडता धनुष्यबाणालाच मतदान करतील, असा आपला ठाम विश्वास आहे.
जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता गेल्या अडीच वर्षात 300 ते 400 कोटी रुपयांचा निधी आणून शहर असेल किंवा ग्रामीण भागात सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. (Shivsena) जालना विधानसभा मतदारसंघाचा भूमिपुत्र म्हणून मी नेहमीच आपल्या सेवेत रुजू आहे. व कुठल्याही अडीअडचणी सुख- दुःखात मी तुमच्या पाठीमागे तत्परतेने उभा असल्याची ग्वाही, खोतकर यांनी मतदारांना दिली.
जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आपण बनवलेला आहे. मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटिबद्ध असल्याचे खोतकर यांनी यावेळी सांगितले. शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख पंडित भुतेकर, सहसंपर्कप्रमुख फिरोज तांबोळी, कैलास गिराम उपस्थीत होते.
सुधाकर गिराम, निवृत्ती मुळे, रहीम चौधरी, गब्बर चौधरी, साळुराम गिराम, तुकाराम खर्जुले, संदीप घारे, अशोक चव्हाण, विठ्ठल एखंडे, राम एखंडे, राम राठोड, परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर माऊली पडोळे, रमेश शिंदे प्रमोद वाघमारे, शिवाजी शेळके यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.