CM Devendra Fadanvis | Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : 'नैतिकतेची अधःपतन' तुमच्या लेखी अजून झालेले नाही ना, मग ज्ञानेश्वरी मुंडे या भगिनीला याच अधिवेशनात न्याय मिळायला हवा!

Opposition Leader Ambadas Danve has urged the Chief Minister to arrest the attackers of Mahadev Mundhe and ensure justice for his family. : महादेव मुंडे यांचा खून होवून सोळा महिने उलटून गेले तरीही या प्रकरणातील आरोपी अजून पोलीसांना सापडलेले नाहीत. या आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे उपोषण सुरू आहे.

Jagdish Pansare

Shivsena News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दुसरीकडे बीडमध्ये आपल्याला न्याय मिळावा यासाठी उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांना आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एक भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे.

महादेव मुंडे खून प्रकरणात न्यायाची अपेक्षा आहे त्यांना. नैतिकतेचे अधःपतन वगैरे आपण काल बोललात. 'नैतिकतेची अधःपतन' तुमच्या लेखी अजून झालेले नाही ना, मग या महिलेला याच अधिवेशनात न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा दानवे (Ambadas Danve) यांनी व्यक्त केली. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा दीड वर्षापूर्वी खून झाला होता.

पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यासाठी लढा देत आहेत. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीकडे द्यावा. (Beed News) खूनाच्या कटात ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत आणि महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागण्यांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करत आहेत.

सकाळीच त्या उपोषणासाठी परळीहून बीडकडे निघाल्या होत्या. अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांचे उपोषण सुरू झाले आहे. महादेव मुंडे यांचा खून होवून सोळा महिने उलटून गेले तरीही या प्रकरणातील आरोपी अजून पोलीसांना सापडलेले नाहीत. या आरोपींच्या अटकेसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे उपोषण सुरू आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात माडणार असल्याचे म्हटले होते.

न्यायासाठी दीड वर्षापासून मुला बाळांसह पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मग आम्हाला न्याय का भेटत नाही ?असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या खून प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय विशेष पथकाची नियुक्ती केली होती .मात्र एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही .ज्ञानेश्वरी मुंडे यांचा उपोषणाला मस्साजोग ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिलाय .

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT