Santosh Deshmukh- Krishna Andhale News Sarkarnama
मराठवाडा

Krishna Andhale News : फरार कृष्णा आंधळेसाठी वॉरंटची मागणी! सरकारी पक्षाचा न्यायालयात अर्ज

A petition has been filed in court seeking an arrest warrant against absconding Krishna Andhale. : संतोष देशमुख हत्येशी संबंधित तिन्ही प्रकरणांची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे.

Jagdish Pansare

Beed Court News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, अवादा कंपनीकडे खंडणीची मागणी, अॅट्रॉसिटी या प्रकरणात आज सोमवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार असून सरकारी पक्षाने या प्रकरणातील फरारी कृष्णा आंधळे याचे वॉरंट न्यायालयाकडे मागितले आहे.

संतोष देशमुख हत्येशी संबंधित तिन्ही प्रकरणांची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. आजच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) उपस्थित राहू न शकल्याने विशेष सहायक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयाकडे पुढील तारीख मागितली. तसेच, कृष्णा आंधळेच्या वॉरंटची मागणी करणारा अर्जही त्यांनी न्यायालयाकडे दाखल केला.

दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळल्यानंतर त्याने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे. (Beed News) इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केले आहेत. या अर्जांवर खून प्रकरणातील फिर्यादी युवराज देशमुख, खंडणी प्रकरणाचे फिर्यादी सुनील शिंदे व मारहाण प्रकरणातील फिर्यादी थोपटे यांच्याकडून म्हणणे आलेले नाही. वाल्मीकच्या मालमत्ता जप्तीबाबच्या अर्जाचाही निकाल राखीव आहे.

दरम्यान, या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार, तर विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार व फरारी कृष्णा आंधळे यांच्यावर खुनाचा ठपका आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरारी आहे, तर उर्वरित आरोपी कारागृहात आहेत. कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला आहे.

कृष्णा आंधळे हा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता. ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत. त्याच्या घरी गरीबी आहे. पत्र्याचं घर आहे. त्याला फारसी काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्कविना राहतो, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी याआधी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT