Krishna Andhale Beed : 'सामना' चित्रपटातला प्रश्न, मारुती कांबळेचं काय झालं? कृष्णा आंधळेचं 232 दिवसांपासून फरार, त्याचं काय झालं?

Beed Santosh Deshmukh Murder Walmik Karad Arrested Krishna Andhale Absconding Sanjay Raut Questions State Government : बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळे संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
Krishna Andhale Beed
Krishna Andhale BeedSarkarnama
Published on
Updated on

Beed Santosh Deshmukh murder : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत संशयित मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा प्रमुख साथीदार कृष्णा आंधळे अजून फरार आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना' चित्रपटातील मारुती कांबळे पात्राचा आठवण झाली.

राजकीय भाष्य करणाऱ्या या चित्रपटात मारुती कांबळे या पात्राची भूमिका मोहन आगाशे यांनी केली. या चित्रपटाच्या शेवटी मारुती कांबळेचं काय झाल? हा प्रश्न पडतो. तसाच संतोष देशमुख हत्येत फरार असलेल्या कृष्णा आंधळेचं काय झालं? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "कृष्णा आंधळेचं काय झाले. पन्नास वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता. जब्बार पटेल यांचा चित्रपट होता. यात डाॅ. श्रीराम लागू आणि निळू फुले त्यात होते. त्यात एक प्रश्न होता, मारुती कांबळे याचं काय झालं? तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न कृष्णा आंधळेचं काय?"

'कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्येतील मुख्य साक्षीदार आहे. त्याला मारलं गेलं. कुठं गायब केलं गेलं. त्याची हत्या झाली. काय आहे. कळू द्या. इतकं सक्षम पोलिस (Police) दल आहे, देवेंद्र फडणवीस यांचं, त्यामुळे आम्हाला कृष्णा आंधळेचं काय झालं हे कळू द्या', असे संजय राऊत यांनी म्हटले. संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे 232 दिवसांपासून फरार आहे. त्याचा शोध विशेष पथकाकडून घेतला जात आहे.

Krishna Andhale Beed
Shani Shingnapur fake app case : 'शनैश्वर'च्या बनावट अ‍ॅपप्रकरणी पोलिसांकडे मोठा लिड; देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर आढळले कोटी रुपये...

संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्याचे अन्य आठ साथीदार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणेचा सहभागाचा आरोप आहे. या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली गेली आहे.

Krishna Andhale Beed
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या क्लिनचीटविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देणार! सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलंय?

विशेष मकोका न्यायालयाने आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचे निरीक्षण नोंदवले. वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याने आपल्या या खटल्यातून दोष मुक्त करावे, असा अर्ज बीडच्या विशेष न्यायालयात सादर केला होता. तो फेटाळून लावताना न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली.

वाल्मिक कराड हाच टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून त्यांची हत्या केल्याचं समोर आले आल्याचं निरीक्षक नोंदवलं आहे. वाल्मिक कराडवर वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून यात मागील 10 वर्षातील सात गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्याचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com