Mla Ramesh Bornare News Sarkarnama
मराठवाडा

Mla Ramesh Bornare News : आमदाराने तक्रार करताच आरटीओचे पथक पहाटे चार वाजता कामाला..

Shivsena : यापुढेही अशा कारवाया सुरुच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्या मतदारसंघातील ओव्हरलोड वाहनांसंदर्भात आरटीओंकडे तक्रार केली आणि पथक वायूवेगाने कामाला लागले. (Mla Ramesh Bornare News) पहाटे चार वाजता आरटीओची दोन पथके वैजापूर तालुक्यात दाखल झाली आणि त्यांनी ४४ ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.

लोकप्रतिनिधींनी एखाद्या विषयात गांभीर्याने लक्ष घातले तर प्रशासन देखील खडबडून जागे होते, याची प्रचिती वैजापूरकरांना आली. (Shivsena) गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मतदारसंघात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो, डंपर, हायवांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशा सूचना आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी प्रादेशिक परिवहन अधिकार विजय कोठोळे यांना केली होती.

आमदारांच्या तक्रारीनंतर बुधवारी (ता. बारा) भल्या पहाटे चार वाजता आरटीओचे पथक वैजापूर परिसरात धडकले. या पथकांनी ४४ ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात धडक कारवाई करत तीन लाखांचा दंडही वसुल केला. (Marathwada) आरटीओच्या कारवाईने परिसरातील वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणारे डंपर, हायवा आणि इतर वाहनांनी धुमाकूळ घातला आहे.

अवजड वाहनांमुळे अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे नव्याने तयार केलेले रस्तेही खराब होत असल्याने ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात कारावाई करण्याची मागणी आमदार बोरनारे यांनी केली होती. या तक्रारीनंतर आरटीओ कार्यालयाच्या दोन वायूवेग पथकांनी आज पहाटे चार वाजता वैजापूर येथे धडक कारवाई सुरु केली. या कारवाईत ओव्हरलोड २० वाहने आणि इतर अशी एकूण ४४ वाहनांच्या विरोधात कारवाई केली.

या सर्व वाहनधारकांना तब्बल ११ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी तीन लाख रुपये जागेवर वसूल करण्यात आले. उर्वरित दंड न भरलेली वाहने वैजापूर पोलिस ठाण्याच्या समोर जप्त करुन लावण्यात आली आहेत. ही कारवाई मोटार वाहन निरिक्षक अमोल खैरनार, संदिप गोसावी, अपर्णा चव्हाण, अश्वीनी खोत, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक गंगाराम भागडे, ऐश्वर्या कराड, वैष्णवी कांबळे, दिव्या कोळसे, परमेश्वर डांगे, संतोष मांजरेकर या पथकाने केली.

दरम्यान, वाळूची वाहतूक करणाऱ्या लॉबीचे प्रचंड मोठे नेटवर्क आहे. आरटीओचे पथक वैजापूर येथे आल्याची माहिती मिळताच वाळू वाहतूक करणाऱ्यांची फोनाफोनी सुरु झाली. त्यानंतर अनेक हायवा रस्त्यावरुन गायब झाल्या होत्या, त्यामुळे आरटीओ पथकाला व्यापक कारवाई करता आली नाही. जिल्हाभरात अवजड वाहनांच्या तपासण्या नेहमीच सुरु असतात. मात्र वैजापूर परिसरात अवजड वाहनांच्या बद्दल आमदार रमेश बोरनारे यांनी तक्रार केली होती, त्यानूसार कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशा कारवाया सुरुच राहणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT