Marathwada : पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत एकहाती सत्ता त्यांच्या हाती सोपवली. दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार मताधिक्याने निवडून आले. (Purna Sugar Factory News) मंगळवारी ता.११ येथील जुने तहसिल परिसरातील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शारदा दळवी, किशोर दुधमल यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
पहिला निकाल उत्पादक सहकारी संस्थामधून आला. शेतकरी विकास पॅनलचे नितीन जाधव यांनी ९४ मते घेत विजय मिळवला. (Hingoli) त्यानंतर एकापाठोपाठ एक शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. (Factory) यामध्ये वसमत गटातून जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, शंकरराव इंगोले, चुडावा गटातून डॉ सुनिल कदम, शहाजी देसाई, गजानन धवन.
तर पुर्णा गटातून भगवान धस, श्रीधर पारवे, बबन बेंडे, जवळा बाजार गटातून सुरेशराव आहेर, चांदू इंगोले, गजानन संवडकर, (NCP) आडगाव -साडेगाव गटातून विश्वनाथ फेगडे, बालासाहेब बारहाते, प्रल्हादराव काळे, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात किशन देशमाने, महिला राखीव प्रवर्गात अंजनाबाई झुंजुर्डे, विमुक्त जाती जमाती प्रवर्गात हरिभाऊ शेळके, इतर मागास प्रवर्ग मध्ये ज्ञानोबा वंजे हे विजयी झाले आहेत.
यावरुन पुर्णा साखर कारखान्याच्या बाबतीत कोणतीच जोखीम न घेता पुन्हा सहकारातील तज्ञ व भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर मतदार सभासदांनी विश्वास दाखवला आहे. तत्पूर्वी एकुण २१५२० मतदारापैकी १७३७२ मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणीसाठी पोलिस विभागाने तगडा बंदोबस्त दिला होता.
राज्यात राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर हिंगोली आणि वसमत तालुक्यातील नेत्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पंरतु जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळवलेला हा विजय मोठा समजला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.