Ajeet Gopchade, Ashok Chavan, Pratap Patil Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

BJP Politics : भाजपच्या अशोक चव्हाणांचं नांदेडमध्ये स्वागत; गोपछडे म्हणाले, दो दिल एक जान है हम...

Ashok Chavan and Ajeet Gopchade : बॅनरवरील फोटोंवरून खासदार गोपछडे यांना कोणता सल्ला दिला?

सरकारनामा ब्यूरो

Nanded Political News :

काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचं नांदेडमध्ये आगमन झाले. काँग्रेस सोडल्यानंतर प्रथमच ते नांदेडमध्ये आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केलं.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये असल्यामुळे जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा आणि ढोल, ताशे, फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.

'दो दिल एक जान है हम'

नांदेड जिल्ह्याला भाजपचे (BJP) तीन खासदार लाभले आहेत. लोकसभेवर प्रताप पाटील-चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar), राज्यसभेवर आता निवडून गेलेले अशोक चव्हाण आणि डॉ अजित गोपछडे (Dr Ajeet Gopchade). आता आम्ही नांदेडमध्ये 'दो दिल एक जान' आहोत आम्ही, आम्ही तिन्ही नेते मिळून फक्त नांदेडची अपेक्षा ठेवत नाही तर राज्यातील सर्व 48 जागांवर भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील याची रणनीती ठरवणार आहोत. आम्ही म्हणजे मी, चिखलीकर,आणि अशोक चव्हाण, असं खासदार गोपछडे यांनी स्पष्ट केलं.

बॅनरवरील फोटो आणि कर्तृत्व

दरम्यान, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनर्सवर नांदेडचे पालकमंत्री गिरीष महाजन आणि खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांचे फोटो नाहीत. त्यावरून चर्चा सुरू झाल्यावर डॉ. अजित गोपछडे म्हणाले, बॅनर्सवरच्या फोटोमुळे कोणी मोठा होत नसतो. माणूस कर्तृत्वाने मोठा होतो.

मी पार्टीकडे कोणते पद मागितले नव्हते. मात्र, माझ्या कामाची दखल घेऊन हे पद मिळाले आहे. कुणीही बॅनर्सवर लक्ष देऊ नये. ,जनतेत जाऊन पाहा, जनतेला देव मानून जो काम करेल, तो पुढे जाईल आणि देशाचं नेतृत्व करेल, अशी प्रतिक्रिया डॉ अजित गोपछडे यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमानतळावर गोंधळ

भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा गोंधळ झाला होता. विमानतळामध्ये प्रवेश करण्यासाठी हे कार्यकर्ते आग्रह करत होते. परंतु पोलिसांनी त्यांना आत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.

त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना बाजूला केले. अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर हजारो कार्यकर्ते जमा झाले होते.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT