Ncp News : 'तुतारी'च्या निनादात पेढे वाटून आनंदोत्सव; कार्यकर्त्यांनी केला ठाण्यात जल्लोष

Poitical News: 'वाजता तुतारी... गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची, तुतारी वाजवणार.. गद्दारांना गाडणार', अशी केली घोषणाबाजी
Thane Program
Thane Program Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने 'तुतारी' हे चिन्ह दिल्यानंतर ठाण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार जल्लोष साजरा केला. या वेळी फटाके फोडत, पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी 'वाजता तुतारी... गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची, तुतारी वाजवणार.. गद्दारांना गाडणार,' अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिले. तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शुक्रवारी (दि. २३) पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला.

Thane Program
MNS Politics : अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणेच काय बीडमधूनही...

यावेळेस माजी नगरसेविका आरती गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहुल पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय, आरोग्य सेलचे अध्यक्ष आसद चाऊस, कार्याध्यक्ष सुभाष यादव, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रित या महाराष्ट्रात आहे. आता तुतारी हेच चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे. कारण जी चिन्हे मागितली होती; त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालविणे अधिक सोपे झाले आहे, असे सांगितले.

R

Thane Program
NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com