Ashok Chavan death threat audio recording Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan Audio Clip: "तुमचा अख्खा नांदेड जिल्हा माझ्या वाकड्यात..! चव्हाणांसह 5 आमदारांच्या हत्येचा कट? खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर; ऐका नेमकं काय घडलं

Ashok Chavan death threat audio recording : अशोक चव्हाण यांच्यासह 5 आमदारांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय? नांदेडमधील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ. ऐका नेमकं काय घडलं.

Rashmi Mane

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडमधील अन्य 4 आमदारांना एकाच दिवशी संपवण्याचा कट रचल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आल्याचे समोर आले आहे. रवी रोकडे नावाच्या आरोपीचे व्यापारी महेश तुतारे यांच्यासोबत झालेले कथित फोन संभाषण व्हायरल झाले असून, त्यात 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी आणि जीवे मारण्याच्या धमकीचाही उल्लेख आहे.

आरोपी रवी रोकडे याने व्यापारी महेश तुतारे यांना फोन करून पैशांची मागणी केली होती. या संभाषणात त्याने 3 वर्षांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील कारेगाव येथे मोठ्या राजकीय नेत्यांना संपवण्याचे नियोजन केल्याचा दावा केला आहे. समोरच्या व्यक्तीने कोणत्या चव्हाणांचा उल्लेख करत आहात, अशी विचारणा केली असता त्याने अशोकराव चव्हाण यांचे नाव घेतल्याचे कथित ऑडिओमध्ये ऐकायला मिळते. याशिवाय 3 ते 4 अन्य आमदारांचाही उल्लेख करण्यात आल्याचा दावा आहे.

आरोपी रवी रोकडे आणि महेश तुतारे यांचे संभाषण

रवी रोकडे -

"चव्हाण साहेबाचा आणि नांदेड मधले तुमचे चार आमदार एका दिवशी उडवायचा मी प्लॅनिंग केला होता कारेगावमध्ये तीन वर्षापूर्वी.

महेश तुतारे-

कोणते चव्हाण?

रवी रोकडे -

"चव्हाण तुमचा अशोकराव चव्हाण आणि तीन आमदार एका दिवशी उडवायचा कारेगावमध्ये प्लॅनिंग केला होता मी, मी तुम्हाला काय सांगतोय माहिती का मी सध्या प्रॉब्लेम मध्ये आलो कोरोनामळे अन्यथा मला ते एक लाख रुपये मला काही महत्त्वाचे नाहीयेत. माझ्या पाठीमागं हात भरपूर मोठे येतात पण मी एकाही जणाला कॉन्टॅक्ट करत नाही मी एवढा दम ठेवतो."

"तुमचा अख्या नांदेड जिल्हा जरी माझ्या वाकड्यामध्ये घुसला ना तरी पण माझं काहीच बिघडू शकत नाही. एवढं मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो बघा एवढा वाकडा आहे. मला ताकद लावण्याची गरज नाहीये, मला फक्त तुमचा एक शब्द पाहिजे एक लाख रुपया नाही होत म्हणून."

दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपमुळे अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेचा आणि नांदेडमधील राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची स्वतंत्र किंवा अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे त्यातील दावे अद्याप पडताळणीच्या अधीन आहेत. पोलीस तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT