Ashok Chavan On Congress News Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Congress : नेतृत्वहीन काँग्रेसमध्ये आता कोण थांबणार? सांगली प्रकरणावरून अशोक चव्हाणांची टीका..

Following Jayshree Patil’s entry into BJP, Ashok Chavan slams the Congress party for its leadership crisis. : प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम या पक्षाकडून होत नाही. सत्ताधारी पक्षावर टीका टिपण्णी करणे हे विरोधी पक्षाचे काम असलं तरी फक्त टीका करून राज्य चालत नाही.

Jagdish Pansare

Nanded Politics : राज्यातील काँग्रेस पक्ष हा आता नात्यागोत्यांचा पक्ष झाला आहे. विरोधी पक्षाचे काम टीका करणे असले तरी केवळ टीका करून चालत नाही. राज्याच्या विकासासाठीचा रोड मॅपही असायला हवा. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रेरणा देणारे नेतृत्व हवे. नेमका काँग्रेसकडे सध्या याचाच अभाव आहे, त्यामुळे अशा नेतृत्वहीन काँग्रेस पक्षात कोण थांबणार? असा अहवाल भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

सांगलीमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून असलेल्या जयश्री पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या संदर्भात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना विचारले तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्ष हा नेतृत्वहीन झाला आहे तो आता नात्यागोत्यांचा पक्ष राहिला असल्यामुळे इथे कोण थांबणार? काँग्रेसची अवस्था ही विशेषता महाराष्ट्र मध्ये नात्यागोत्यांचा पक्ष अशी झाली आहे.

प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम या पक्षाकडून होत नाही. सत्ताधारी पक्षावर टीका टिपण्णी करणे हे विरोधी पक्षाचे काम असलं तरी फक्त टीका करून राज्य चालत नाही. (Congress) त्यासाठी काही कष्टही करावे लागतात, राज्याच्या विकासाचा रोड मॅप तयार करावा लागतो. टीम बरोबर घेऊन त्यांना उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने यातील कुठलीच बाब महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

त्यामुळे स्वाभाविक आहे लोक किती दिवस वाट पाहतील. सांगलीत ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामागे काँग्रेस आता नेतृत्वहीन झाली आहे त्यामुळे अशा गोष्टी घडणारच, असेही अशोक चव्हाण म्हणाले. दोन दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात झालेला विकास हा काँग्रेसच्या काळातील विकासापेक्षा दुप्पट वेगाने झाल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा काँग्रेस हा पक्ष नात्यागोत्यांचा आणि नेतृत्वहीन झाल्याची टीका चव्हाण यांनी केली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केल्याप्रकरणी ही कारवाई वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. आता उद्या मुंबईत जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT