Nanded News : मी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होतो, त्यामुळे त्या काळात झालेला विकासही मी पाहिलेला आहे. काँग्रेसच्या काळात विकास झाला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या काळातील विकासाचा वेग हा त्यापेक्षा दुप्पट होता, असा टोला माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला लगावला. काल आयपीएलचा आहे, कमी वेळात तुम्ही किती साध्य करता हे महत्वाचं असल्याचेही चव्हाण म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे चाहते झाले आहेत. मोदी सरकारचे कौतुक करताना ते थकत नाहीत. मोदी यांच्या पंतप्रधान पदाला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'संकल्प से सिद्धी तक' हा उपक्रम सध्या राबवला जात आहे. या निमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा, मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. नांदेडमध्ये नुकतीच पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा संपन्न झाली.
खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची जंत्रीच मांडली. विभागनिहाय झालेल्या विकासकामांची आकडेवारी देत त्यांनी आतापर्यंत सगळ्यात वेगवान विकास हा मोंदीच्या कार्यकाळात झाल्याचा दावा केला. काँग्रेसच्या काळात देशात विकास झाला पण त्यापेक्षा दुप्पट वेगाने मोदींच्या नेतृत्वाखालील अकरा वर्षाच्या सरकारने केला.
सध्या जमाना आयपीएलचा आहे, कमी आणि निर्धारित वेळेत तुम्ही किती साध्य करता याला महत्व असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक डेडलाईन सेट केली आहे. 2047 पर्यंत भारत हा विकसित देश म्हणून नावारुपाला येईल, हे उदिष्ट घेऊन मोदीजी पुढे जात आहेत. कोणत्या विभागात किती विकास झाला हे मी आकडेवारीसह सांगितले आहे. काँग्रेसच्या काळात विकास झाला, पण त्यापेक्षा दुप्पट वेगाने गेल्या अकरा वर्षात झाला हे मी नमूद करू इच्छितो. असं यापुर्वी कधी घडलं नव्हत असेही चव्हाण म्हणाले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी म्हणजे काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी अनेक जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या गॅरंटीवर टीका केली होती. या देशात मोदींची नाही तर फक्त काँग्रेसची गॅंरटी चालणार, असे चव्हाण सांगयाचे. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांचे झालेले हे मत परिवर्तन सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.