Ashok Chavan Meet Narendra Modi  Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan Meet Pm Modi : विमानतळावर भेट अन् भाजपवासी अशोक चव्हाण यांनी मानले PM मोदींचे आभार!

Ashok Chavan has kept the photo social media handle : अशोक चव्हाणांनी नांदेड विमानतळावर पंतप्रधान मोदी सोबतचा फोटो सोशल मीडिया साइटवर ठेवला आहे.

Jagdish Pansare

Nanded Airport Ashok Chavan meet PM Modi : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊन आठवडा उलटून गेला आहे, पण त्यांच्या पक्ष प्रवेश आणि राज्यसभेवर मिळालेल्या संधीची चर्चा अजूनही राज्याच्या राजकारणात सुरू आहे. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे छातीठोकपणे सांगणारे अशोक चव्हाण अखेर भाजपमध्ये गेलेच, याचा अनेकांना धक्का बसला होता. आता अशोक चव्हाण हळूहळू भाजपची सिस्टिम समजून घेत आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणातील आदिलाबादहून चेन्नईला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर आले होते. अशोक चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन नांदेड विमानतळावर Nanded Airport स्वागत केले. अगदी काही मिनिटांच्या या भेटीत चव्हाण यांनी मोदींचे आभार मानले. Ashok Chavan Meet Pm Modi राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल मोदीजी आपले मनःपूर्वक आभार, असे म्हणत दोघांनीही हस्तांदोलन केले.

अशोक चव्हाण यांनी मोदींसोबतचा हाच फोटो आपल्या सोशल मीडियाच्या हँडलवर प्रोफाइल म्हणून ठेवला आहे. मोदींचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी Narendra Modi यांचे आज आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला रवाना होण्यासाठी नांदेड विमानतळावर आगमन झाले. त्यांचे नांदेड विमानतळावर स्वागत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने मला राज्यसभेची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. पाच राज्यांच्या तीनदिवसीय दौऱ्यादरम्यान नरेंद्रजी मोदी यांचे आज दुपारी नांदेड विमानतळावर आगमन झाले. नांदेड जिल्हावासीयांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या या भेटीत मोदी Narendra Modi आणि चव्हाण Ashok Chavan यांच्यात चर्चा आणि हास्यविनोदही झाला. त्यानंतर मोदी आपल्या नियोजित चेन्नई दौऱ्यासाठी रवाना झाले. अशोक चव्हाण यांच्या भाजप BJP प्रवेशामुळे एक मोठा मराठा नेता पक्षाच्या गळाला लागल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. नांदेड Nanded जिल्ह्यात अशोक चव्हाण यांनी अख्खी काँग्रेसच Congress भाजपमध्ये आणली आहे. आता मराठवाडा Marathwada आणि राज्यात किती चव्हाण समर्थक भाजपमध्ये येणार ते येत्या काळात कळेल, त्याचा किती लाभ भाजपला होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

Edited By : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT