Ashok Chavan News, Aurangabad
Ashok Chavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Budget : मोदी सरकार मोठमोठे आकडे सांगते, यापुर्वीच्या घोषणांचे काय ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प (Budget) म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार ठरला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आता ७ लाख रुपये केली आहे. मात्र, महागाईचे वाढते प्रमाण पाहता ही सवलत मागणी वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे केवळ एक मृगजळ उभे करण्यात आल्याची टीका देखील चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली.

ते म्हणाले, जुलै २०२२ पासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सुमारे ३७ डॉलर्स प्रती बॅरलने घट झाली. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या सर्वसामान्य किरकोळ ग्राहकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले. इंधनावरील करांच्या रचनेत सुद्धा कोणताही बदल केला नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १० लाख कोटी रूपये भांडवली खर्चाची घोषणा केली. भांडवली खर्च दरवर्षी वाढवला जात असताना बेरोजगारीत घट का होत नाही?

मनरेगाच्या तरतुदीत २१.६६ % कपात करून यंदा जेमतेम ६० हजार कोटींची तरतूद आहे. हा अर्थसंकल्प रोजगार निर्मितीसाठी सकारात्मक नाही. मागील ९९ महिन्यांपासून निर्यात वाढीचे प्रमाण उणे असून, निर्यातीस खिळ बसली आहे. डॉलरची किंमत ८२ रूपयांवर गेल्याने आयात महाग होऊन महागाई वाढते आहे. चालू खात्यात ४.४ टक्के तूट आहे. पुढील वर्षात वित्तीय तुटीचा ५.९ टक्क्यांचा आकडा अवास्तव वाटतो.

भाजपचे केंद्र सरकार मोठमोठे आकडे जाहीर करते, नवनवीन घोषणा केल्या जातात. मात्र, त्या घोषणांची अंमलबजावणीच होत नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात युपीए-१ व युपीए-२ च्या तुलनेत हमीभाव वाढीचे प्रमाण कमी झाले आहे.

२०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर देण्याची घोषणा झाली होती. त्याची अंमलबजावणी न झाल्याने लोकसभा निवडणुकीत फटका बसेल या भीतीने यंदा अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेचा खर्च वाढविण्याचे जाहीर झाले आहे. मात्र, यापूर्वीच्या इतर घोषणांचे काय, याबाबत केंद्राकडे उत्तर नसल्याचेही चव्हाण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT