Imtiaz Jalil News : मेडिकल काॅलेज, रुग्णालयाच्या १४ कोटींच्या दुरुस्तीचे गौडबंगाल काय ?

Aimim : विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना सोयीसुविधा मिळत नाही. परिणामी त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते.
Imtiaz Jalil News, Aurangabad
Imtiaz Jalil News, AurangabadSarkarnama

Aurangabad : गोरगरिबांची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील तीन इमारतींच्या दुरुस्तीसाठी तब्बल १४ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आले. यावर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आश्चर्य व्यक्त करत एवढ्या रक्कमेत तर नव्या इमारती बांधता येतील, मग दुरुस्तीवर एवढा खर्च कसा? असा प्रश्न उपस्थितीत करत या सगळ्या कामांची आणि प्रस्तावाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Imtiaz Jalil News, Aurangabad
Rajesh Tope News : लोकशाहीवर भाषण ठोकणाऱ्या भुऱ्याची टोपेंनाही भुरळ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद (घाटी) संस्थेच्या वस्तीगृह, बाह्यरुग्णविभाग व शल्यचिकित्साशास्त्र विभाग इमारतीचे मजबूतीकरण व नूतनीकरण करणेसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १४,६७,००,०००/- (अक्षरी रुपये चौदा कोटी, सदुसष्ट लक्ष) रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (Aimim) खासदार इम्तियाज जलील यांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त करत शंका व्यक्त केली आहे. (Aurangabad)

नविन बिल्डींग बांधली असती इतक्या पैशात, असा टोला लगावत त्यांनी या प्रस्तावाची आणि दुरुस्तीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होवून आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागतो. रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी दिला जातो.

परंतु निधीची मंजुर करत असतांना शासनाला सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाची शहानिशा करणे गरजेचे आहे. शहानिशा न करताच फक्त काहीजणांना आर्थिक फायदा पोहोचविण्याच्या उद्देशाने निधीला मंजुरी दिली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते. १४ कोटी ६७ लाखांच्या निधीतून अशी कोणती दुरुस्ती घाटी प्रशासन करणार आहे, या सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी व यंत्रणा उपलब्ध करुन दिली जाते. एवढ्या निधीत संपुर्ण नविन इमारतीचे बांधकाम होवू शकते परंतु घाटी प्रशासनाच्या हलगर्जी व निष्क्रियतेपणाच्या कारभारामुळे विविध आजाराने ग्रस्त रुग्णांना सोयीसुविधा मिळत नाही. परिणामी त्यांना नाईलाजाने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते, हे दुर्दैवी असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com