NCP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पुतण्याने काकाची साथ सोडली आहे. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री, भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची साथ सोडत पुतण्या उदय चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे समर्थकांनी देखील काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग वाढवण्यास सुरवात करत अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे.
रविवारी चव्हाणवाडी (ता.मुखेड) येथे अशोक चव्हाणांचे पुतणे उदय चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी यांनी तसेच काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला होता. उदय चव्हाण हे चिखलीकरांचे यांचे समर्थक मानले जातात.
1980 च्या दशकात उदय चव्हाण हे पैठणहून नांदेडला आले. त्यानंतर ते बराच काळ अशोक चव्हाण यांचे स्थानिक राजकारणाती सहकारी राहिले. 1990 मध्ये ते भाजपमध्ये गेले. भाजप आणि काँग्रेसकडून ते नांदेडमध्ये नगरसेवक होते.
भाजपचे माजी खासदार डी बी पाटील यांचे निकवर्टीत देखील ते होते मात्र पुढे त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ दिली. काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी त्यांना धर्माबादमधील लाल बहादूर महाविद्यालयात संधी दिली. सात वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी सेवानिवृ्त्ती घेतली होती. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे टाळले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.