Thackeray Vs Modi : 'भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? काय सौदा झाला...', उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा

Shiv Sena UBT Criticize PM Narendra Modi : भारत पाकिस्तानमधी शस्त्रसंधीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसर्‍या देशाचा हस्तक्षेप मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Vs Narendra Modi
Uddhav Thackeray Vs Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

India-Pakistan Ceasefire : भारता पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी विषयीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. आज भारत पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये बैठक होत आहे. या बैठकीच्या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वर्तमानपत्रातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

'ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाईनचे युद्ध थांबवले नाही. तेथे सरळ इस्रायलला पाठिंबा देऊन ते 'गाझा'तील जनतेचे शिरकाण पाहत बसतात आणि भारताला मात्र शांतीचा उपदेश देतात. प्रे. ट्रम्प यांनी भारताचे सार्वभौमत्व विकत घेतले काय? कशाच्या बदल्यात ? नक्की काय सौदा झाला? देशाला कळायलाच हवे', असा प्रश्न शस्त्रसंधीवरून 'सामना'तून पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Vs Narendra Modi
Manoj Naravane: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्या हल्ल्यानंतर 'अभी पिक्चर बाकी है' म्हणणारे मनोज नरवणे आता काय म्हणाले?

'सीमला करारानुसार भारत पाकिस्तानमध्ये तिसर्‍या देशाच्या हस्तक्षेप मान्य नाही. मात्र, भारत पाकिस्तानमधी शस्त्रसंधीची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यामुळे नरेंद्र मोदींना तिसर्‍या देशाचा हस्तक्षेप मान्य आहे का? भारताच्या पंतप्रधानांनीच सिमला कराराचे उल्लंघन केले.भारताने ट्रम्प यांच्या दबावास बळी पडून शस्त्रसंधीस मान्यता दिली.' असा जोरदार प्रहार देखील मोदींवर सामनातून करण्यात आला आहे.

ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले का?

'ऑपरेशन सिंदूर' किंवा पाकिस्तानचा बदला पूर्ण झाला काय? याचे उत्तर देशाला मिळाले नाही. पाकिस्तान जागच्या जागी ठणठणीत उभे आहे व पाकड्या पंतप्रधानांनी 'युद्ध आम्हीच जिंकलो' अशी वल्गना करून पहलगाम हल्ल्यात सिंदूर उजाड झालेल्या 26 भगिनींच्या जखमेवर मीठ चोळले. हे सर्व घडत असताना पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गृहमंत्री कोठेच दिसत नाहीत, असे निशाणा देखील सरकारवर उद्धव ठाकरेंनी सामनाच्या माध्यमातून साधला आहे.

Uddhav Thackeray Vs Narendra Modi
Ram Shinde Vs Rohit Pawar : रोहित पवारांना राम शिंदेंकडून पुन्हा शह; गटनेतेपद बंडखोर नगरसेवकांकडेच!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com