Ashok Chavan News Sarkarnama
मराठवाडा

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधी वाजणार? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितला मुहूर्त!

Ashok Chavan Nanded Lok Sabha Constituency : अशोक चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा...

Laxmikant Mule

Marathwada Political News :

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी बैठकांचा धडाका सुरू आहे. अशात काँग्रेसनेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीचा मुहूर्तच सांगून टाकला. येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याचा दावा चव्हाण यांनी नांदेड येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात केला.

लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते, या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण आता नांदेड लोकसभा मतदारसंघात अॅक्टिव्ह झाले आहेत. सात दिवसांपासून नांदेड मुक्कामी तळ ठोकून असलेल्या चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळावा, आढावा बैठकांचा धडाका सुरू केला आहे. बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी नुकताच घेतला. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करीत चव्हाण यांनी LokSabha Election 2024 ची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

शंकरनगर (जिल्हा नांदेड) येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी येत्या पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार असल्याचे सांगितले. नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जातो. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केला होता. ही जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आठवडाभराच्या नांदेड मुक्कामात चव्हाण यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. बिलोली, देगलूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, बुथ कमिटी सदस्य व कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. यावेळी माजी खासदार भास्कर पाटील-खतगावकर, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, अमरनाथ राजूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, डॉ. मीनल पाटील-खतगावकर यांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्यात अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीविषयी भाष्य केले. दिल्ली येथील महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीसह अन्य समविचारी पक्षांना इंडिया आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले. नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा बँक आदी सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहेत. महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे गटाची साथ आहे. यात वंचित बहुजन आघाडीची भर पडली तर काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो, असा विश्वासही यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

edited by sachin fulpagare

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT