Ashok Chavan Nanded BJP Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : अशोक चव्हाणांनी नांदेड काँग्रेसमुक्त करण्याचा उचलला विडा; दिल्लीहून येताच भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरू!

Laxmikant Mule

Nanded Political News : 'ईडी'ची ईडापिडा टळली, डबघाईस आलेल्या साखर कारखान्याला जीवदान मिळाले, अन् भाजपात प्रवेश करताच थेट राज्यसभेवर नियुक्तीही मिळाली. असं सगळं काही छप्पर फाडके मिळाल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीही आपल्या नव्या हायकंमाडला खूष करण्यात कसर सोडली नाही. दिल्लीहून नांदेडमध्ये परतल्यापासून अशोक चव्हाण यांनी जणूकाही नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा विडा उचलल्याचे दिसत आहे.

त्यानूसार आधी 55 माजी नगरसेवक, त्यानंतर माजी महापौरांसह शेकडो महिला पदाधिकाऱ्यांचा त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून घेतला. याची चर्चा संपत नाही तोच आत पुन्हा भोकर विधानसभा मतदारसंघासह अर्धापूर तालुक्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हाती भाजपाचे कमळ देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. एकीकडे काँग्रेस अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्या पक्ष सोडून जाण्याने काहीही फरक पडणार नाही, असे सांगत स्वतःचे समाधान करुन घेत आहे. तर दुसरीकडे अशोक चव्हाण मात्र दररोज कुठे ना कुठे जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा वेग पाहता लवकरच नांदेड जिल्हा काँग्रेसमुक्त होणार असे दिसते. अशोक चव्हाण यांच्याकडून काँग्रेसला धक्क्यावर धक्के देणे सुरूच आहे. मराठवाड्यातील अशोक चव्हाण यांच्यानंतर बसवराज पाटील(Basavaraj Patil) हे भाजपच्या गळाला लागले आहेत. नांदेडमध्ये तर काँग्रेसमध्ये कोणी राहते का नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हा भाजपामय करण्याचा विडा उचलून नांदेड(Nanded) मध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनी जास्त वेळ न दवडता आपल्या काँग्रेसमधील समर्थकांना भाजपाचा दुपट्टा घालण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या चार दिवसांपासून चव्हाण नांदेडमध्येच तळ ठोकुन आहेत. आपल्या मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या तब्बल 55 नगरसेवकांचा भाजपात त्यांनी प्रवेश करून घेतला.

तर सोमवारी नांदेड शहर व जिल्ह्यातील शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्तेही भाजपात दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही भोकर विधानसभा मतदारसंघ व अर्धापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते भाजपात आले आहेत. लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसात जाहीर होऊ शकतो. ऐन‌ निवडणूकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला दररोज धक्के बसत आहेत.

शतप्रतिशत भाजपा(BJP) करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील त्यांच्या समर्थकांना भाजपत आणण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख महिला पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्षा, काँग्रेसच्या महिला पदाधिऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघात अर्धापूर तालुक्याचा समावेश होता.

या तालुक्यातील बाजार समितीचे सदस्य, सरपंच, तालुका व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी, नगरसेवक प्रतिनिधिंनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन जय श्रीराम म्हणत भाजपात प्रवेश केला. भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्याने भाजपात प्रवेश देण्याचे धोरण अशोक चव्हाण यांनी आखले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, बाजार समितीचे माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaaprkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT