Ayodhya Ram Mandir Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : 'राम देव्हाऱ्यात असावा...' अशोक चव्हाणांचा भाजपला टोला?

Ayodhya Ram Mandir : अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये लावलेल्या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

लक्ष्मिकांत मुळे

Nanded News : देशभरात सोमवारी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची धूम सुरू आहे. सगळे वातावरण राममय झाले आहे, शोभायात्रा, यज्ञ, प्रसाद, निमंत्रण, अक्षदा, मंदिरांची साफसफाई, सजावट असे भारावलेले वातावरण सध्या सगळीकडे आहे. मात्र भाजपकडून रामाच्या नावावर राजकारण केले जात आहे, असे म्हणत काँग्रेसने निमंत्रण असूनही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणे टाळले आहे.

एवढेच नाही, तर काँग्रेस नेत्यांकडून राम देव्हाऱ्यात असावा, असा सल्लाही दिला जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये लावलेल्या पोस्टरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या पोस्टरमधून चव्हाण यांनी भाजपला चिमटे काढल्याचे दिसत आहे. अशोक शंकरराव चव्हाण एवढाच उल्लेख असलेले आणि रामाची महती सांगतानाच भाजपला टोला लगवाण्याची संधीही चव्हाण यांनी साधली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील प्रमुख चौकात लागलेल्या या बॅनरची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा होत आहे. रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम... तसेच `राम देव्हाऱ्यात असावा, आम्ही कालही राम राम करत होतो,आजही करतो, राम आचरणात असावा, अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण अशा नावाशिवाय इतर कसलाही उल्लेख किंवा फोटोचा वापर करण्यात आलेला नाही हे विशेष. भाजपाला सर्वधर्म समभावाचा सल्ला देत, फटकारणारी ही पोस्टर चांगलीच झोंबणारी आहेत. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

काँग्रेस यात आघाडीवर असून आता अशा पोस्टरबाजीतून नेते भाजपला लक्ष्य करत आहे. भाजपाने राम मंदिराचा मुद्दा आणि प्रभू श्रीरामांचा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणा सोहळा हायजॅक केल्याचा आरोपही केला जातो. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हण यांनी सोशल मिडिया आणि थेट नांदेड शहरात पोस्टर लावूनच भाजपवर टीकेची संधी साधली.

Ayodhya Ram Mandir

श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने बॅनर लावून त्या माध्यमातूनच चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रिय असलेल्या भजनाच्या ओळींचा उल्लेख करत भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. नुकतीच मकरसंक्रात होऊन गेली, या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी राजकारणातील कटुता कायमची नाहीसी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

त्यानंतर आज देण्यात आलेल्या शुभेच्छा संदेशात धर्माच्या नावावर तेढ निर्माण होऊ नये, समाजात एकोपा निर्माण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चव्हाणांनी लावलेल्या बॅनरवर कुठल्याही नेत्याचा, राजकीय पक्षाचा, चिन्हाचा किंवा झेंड्याचा वापर केलेला नाही. पण ही पोस्टरबाजी कोणासाठी? हे न कळण्या इतकी जनता दुधखुळी नाही, एवढे मात्र निश्चित.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT