मराठवाडा

Congress leader joins BJP : काँग्रेसला 'झिरो' करण्यासाठी अशोक चव्हाणांची धडपड : निवडणूक जाहीर होताच फोडला हुकमी शिलेदार

Nanded municipal election : नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप; काँग्रेसचे दिग्गज शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली.

Jagdish Pansare

Nanded Vaghela municipal corporation election : महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत काँग्रेसच्या माजी महापौर आणि उपमहापौरांनी भाजपचे कमळ हाती घेत मोठा धक्का दिला आहे. खासदार अशोक चव्हाण आणि भाजपचे मंत्री तथा राज्याचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत सुरुवातीपासूनच भाजपने आघाडी घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील सगळी सूत्र आपल्या हाती घेत बाहेरच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष निलेश पावडे, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यातील त्यांचे समर्थक पक्षात येतील असा अंदाज होता. मात्र त्यावेळी कुठलेही मोठे प्रवेश झाले नव्हते. विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात अशोक चव्हाण यांना आपल्या समर्थकांना भाजपमध्ये आणण्यात यश आले होते. तरीही काही जण 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत होते.

माजी आमदार अमर राजूरकर आणि माजी मंत्री डी.पी. सावंत यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावडे आणि तरोडेकर यांनी काँग्रेसमध्ये आपला योग्य सन्मान राखला जात नसल्याचा आरोप करत भाजपात प्रवेश केला आहे. नांदेड- वाघाळा महापालिका निवडणुकीत जयश्री पावडे, सतीश देशमुख तरोडेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

या पक्षप्रवेशाला भाजपचे संघटन मंत्री संजय कौडगे, महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकारी,महापालिका निवडणुकीतील इच्छुक उपस्थित होते. वसमत दौऱ्यावर जाण्यापूर्वी नांदेड विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये घाईघाईने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने 20 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया नुकतीच पार पाडली. त्यानंतर सक्षम उमेदवारांचा शोध सुरू असतानाच काँग्रेसच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT