Ashok Chavan vs Pratap Patil Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Nanded Politics: विलासरावांच्या उपकाराची चिखलीकरांकडून आठवण; अशोक चव्हाणांचीही कुरघोडी! कलगीतुरा रंगला

Ashok Chavan vs Pratap Patil Chikhlikar: प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा उल्लेख टाळत विलासराव देशमुख यांनी केलेला मदतीचा उल्लेख केला. जोपर्यंत बँक अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासरावांचे उपकार आपल्याला विसरता येणार नाहीत, असे ते म्हणाले.

Jagdish Pansare

Nanded Politics News: नांदेड जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले. दोघांनी आपापल्या भाषणात एकमेकांवर कुरघोडीची संधी सोडली नाही. नांदेड जिल्हा बँकेच्या भोकर येथील शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हा बँकेवर विलासराव देशमुखांचे खूप उपकार आहेत, ते विसरता येणार नाहीत, असे सांगत बँकेच्या यशाचे श्रेय त्यांना अशोक चव्हाणांना डिवचले.

अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात प्रताप पाटील चिखलीकर यांचा उल्लेख टाळत त्यांच्या विधानाचा अशोक चव्हाणांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. नांदेड जिल्हा बँकेसाठी मी काय केले? असे विचारणाऱ्यांना हे माहित नाही, की विलासराव देशमुख यांनी नांदेड जिल्हा बँकेसाठी ते मुख्यमंत्री असताना शासनाकडून दिलेल्या 120 कोटी रुपयांच्या कर्जाचे आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अनुदानात रुपांतर केले, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगीतले.

नांदेड जिल्हा बँकेच्या मागील काळातील बिकट परिस्थितीचा उल्लेख यावेळी अनेकांनी केला. या बँकेला उभारी देण्यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील तेव्हाचे मंत्री अशोक चव्हाण यांची मदत झाल्याचे अजय कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात अशोक चव्हाण यांचा उल्लेख टाळत विलासराव देशमुख यांनी केलेला मदतीचा उल्लेख केला. जोपर्यंत बँक अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासरावांचे उपकार आपल्याला विसरता येणार नाहीत, असे ते म्हणाले.

याला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मी काय केले? असे काही जण विचारतात. त्यांना उत्तर द्यायचे झाले तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या बँकेला सरकारकडून कर्ज स्वरूपात दिलेल्या 120 कोटी रुपयांचे अनुदानात रूपांतर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना मीच घेतला होता, याची आठवण करून चिखलीकरांचा मुद्दा खोडून काढला.

विलासरावांनी केलेली मदत कर्ज स्वरूपातील होती त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपद मला मिळाल्यावर काही महिन्यातच मी शासनाच्या त्या कर्जाची रूपांतर अनुदानात केल्यामुळे बँकेला शासनाची रक्कम फेडावी लागली नाही. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील गटाला बँकेत बहुमत मिळाले.

आधी वसंतराव चव्हाण यांनी आणि त्यांच्यानंतर भास्करराव खतगावकर बँकेचे अध्यक्ष झाले. आमच्या गटाच्या कार्यकाळात ही बँक संचित तोट्यातून बाहेर आली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला सात कोटींचा निव्वळ नफा झाला ही आनंदाची बाब असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांना प्रत्युत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT