Ashok Chavan News : मराठा आरक्षणाचा विषय अधिक गंभीर बनला आहे. राज्य सरकारला दिलेली डेडलाइन संपल्यानंतर अंतरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. (Maratha Reservation) मंत्री, आमदार, खासदारांना गावात न येऊ देण्याची घोषणा केल्यानंतर याचे पडसादही राज्यभरात उमटत आहेत. पाचशेहून अधिक गावांनी राजकारण्यांना प्रवेशबंदी केली आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांना यांचा फटका बसत आहे.
रावसाहेब दानवे, अतुल सावे, गिरीश महाजन, अजित पवार, अशोक चव्हाण यासह अनेकांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांना तर त्यांच्यात नांदेड (Nanded) जिल्ह्यात दोन वेळा काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांचे बलिदान होत असताना येत्या २८ आॅक्टोबर रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षण आणि त्यासाठी तरुणांचे बळी जात असताना वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. (Congress) कुणीही मला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका, हार-तुरे आणू नका, ते मी स्वीकारणार नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नुकत्याच झालेल्या आत्महत्या आणि आरक्षणासंदर्भात लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुळात मी वाढदिवस साजराच करत नाही. मात्र, दरवर्षी लोक भेटायला येतात, त्यांच्या इच्छेचा मान ठेवावा लागतो. यंदा कोणीही गुच्छ वगैरे घेऊन येऊ नये, ही विनंती. यावर्षी मी वाढदिवसाचा हार किंवा स्वागत स्वीकारणार नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण मुलांनी केलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. सर्वांना त्याचे तीव्र दुःख आहे आणि अशा प्रसंगात वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटणारे नाही. त्याचप्रमाणे कोणीही वाढदिवसाचे फलक लावू नयेत, असे आवाहनही चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना त्या सरकारमध्ये मंत्री असलेले अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. परंतु मराठा आरक्षण टिकवण्यासंदर्भात तेव्हा काहीच प्रयत्न झाले नाहीत, असा आरोप चव्हाण यांच्यावर केला जातो. दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. सत्तेत असताना ते हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे वाट पाहण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली होती.
तर आता विरोधी पक्षात असताना राज्य आणि केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन ते करतात. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेबद्दलही समाजामध्ये विशेषतः तरुणांमध्ये राग आहे. तो निदर्शने आणि काळे झेंडे दाखवण्यातून व्यक्त होतो. समाजाचा हा रोष कमी करण्यासाठीच अशोक चव्हाण यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.